नेपोटीझम वाद : 'सडक २'वर प्रेक्षकांची जोरदार टीका!

    13-Aug-2020
Total Views | 157
sadak 2_1  H x

‘सडक २’च्या ट्रेलरला सर्वाधिक डिसलाईक!

मुंबई : 'सडक २' चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. सध्या यूट्यूबवर हा ट्रेलर ट्रेंडही होत आहे. २४ तासांच्या आत या ट्रेलरला एक कोटी १४ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत. पण त्याचवेळी स्टारकिड्सची भरणा असलेल्या ‘सडक २’ च्या ट्रेलरला ४३ लाखांपेक्षा जास्त डिसलाईक मिळाले आहेत. एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरला २४ तासांत इतक्या मोठ्या प्रमाणात डिसलाईक मिळण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे! तर केवळ अडीच लाखांच्या जवळपास लोकांनी या ट्रेलरला पसंती दर्शवली आहे.


‘सडक २’वर प्रेक्षकांचा असलेला रोष ट्रेलरला मिळालेल्या प्रतीसादावारुंच लक्षात येत आहे. यूट्यूबवर प्रदर्शित झाल्याच्या १२ तासांतच हा ट्रेलर ३६ लाखांपेक्षा जास्त वेळा डिसलाईक करण्यात आला. तर २० लाख डिसलाईक ८ तासांच्या आत झाले. त्यामुळे सध्या हा ट्रेलर सर्वाधिक नापसंत केलेला व्हिडीओ म्हणून चर्चिला जात आहे. विशेष म्हणजे जगभरात सर्वाधिक नासपंत केलेल्या ‘टॉप ५०’ व्हिडीओमध्ये 'सडक २'चा ट्रेलर अकराव्या स्थानावर पोहोचला आहे.


नेपोटीझम वादाचा मोठा फटका या चित्रपटाला बसला आहे. लोक मोठ्या संख्यने 'सडक २'चा ट्रेलर नक्कीच पाहत आहेत, परंतु बॉलिवूमध्ये नेपोटीझम आणि नेपोटीझमच्या केंद्रस्थानी असलेल्या कलाकारांना घेऊन बनवलेल्या या चित्रपटाबाबत आपला संताप व्यक्त करताना थेट डिसलाईकचे बटण दाबत आहेत. आपला संताप प्रेक्षक थेट 'सडक २'च्या ट्रेलरला निशाणा बनवून व्यक्त करत आहेत.


या चित्रपटात संजय दत्त, आलिया भट्ट, पूजा भट्ट आणि आदित्य रॉय कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हे सर्व कलाकार ‘स्टारकिड्स’ म्हणून नावाजलेल आहेत. प्रमुख भूमिकेत असलेल्या आलिया आणि पूजा या दोघी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट यांच्या मुली आहेत. विशेष म्हणजे महेश भट आणि चित्रपटाचे निर्माते मुकेश भट यांचे वडीलही चित्रपटसृष्टीतीलच होते. नानाभाई भट आपल्या काळातील प्रख्यात सिनेमॅटोग्राफर होते. तर संजय दत्त हा सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा मुलगा आहे. याशिवाय आदित्य रॉय कपूर हा चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरचा भाऊ आहे.


नेपोटिझमने अर्थात घराणेशाही पुरस्कृत हा चित्रपट न पाहण्याचे संकेत प्रेक्षक ट्रेलर डिसलाईक करुन देत आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या ट्रेलरवर कठोर शब्दा कमेंट आणि टिप्पणी केली जात आहे. यावरुनच त्यांची नाराजी स्पष्ट होत आहे.
नेपोटीझमुळे ‘सडक २’ चित्रपटाला फटका बसला आहेच. परंतु तो प्रदर्शित करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणजेच डिस्ने हॉटस्टार अॅपवर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आलिया भटने हा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला, मात्र तिने आपला कमेंट बॉक्स बंद केला, जेणेकरुन नेटिझन्स तिच्यावर किंवा चित्रपटावर काही वाईटसाईट कमेंट्स करु नयेत.


दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडला जोरदार झटका बसला. लोक सातत्याने सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत. तर नेपोटीझमवरुन बॉलिवूडच्या स्टारकिड्स विरोधात संतापही व्यक्त करत आहेत. परंतु त्याचा फटका सध्या 'सडक २'च्या ट्रेलरला बसत आहे.










अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121