'आरोग्य सेतू अॅप' पूर्णपणे सुरक्षित असल्याची सरकारकडून ग्वाही!

    06-May-2020
Total Views |
arogya setu_1  

हॅकिंगच्या अफवेनंतर 'आरोग्य सेतू अॅप'कडून पत्रक जारी


मुंबई : कोरोना व्हायरस संकट काळात मोदी सरकारकडून ‘आरोग्य सेतू अॅप’ लॉन्च करण्यात आला. याद्वारे नागरिकांना स्वप्रकृती तपासता येईल. तसेच आरोग्य विषयक अनेक सुविधा यात देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना हे अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक केले असून देशभरातील नागरिकांना अॅप वापरण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. दरम्यान हे अॅप सुरक्षित नसल्याचा अलर्ट एका हॅकरकडून देण्यात आला होता. त्यानंतर मोदी सरकारकडून आरोग्य सेतू अॅपच्या सुरक्षेबाबत घोषणा करण्यात आली. यासाठी त्यांनी एक पत्रक जारी केले आहे.





फ्रान्सच्या सिक्युरिटी रिसर्चर रॉबर्ट बाप्टीस्ट आणि इथिकल हॅकर म्हणून ओळखले जाणारे इलोइट अल्डरसन यांनी आरोग्य सेतू अॅपच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले होते. तब्बल ९ कोटी लोकांना वैयक्तिक माहिती लिक होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर हे पत्रक आरोग्य सेतू अॅप बनवणाऱ्या डेव्हलपर कडून जारी करण्यात आले आहे.


सोमवारी इलोइट अल्डरसन यांनी ट्विट करत म्हटले होते की, "आरोग्य सेतू अॅपच्या सुरक्षिततेमध्ये काही समस्या आहे. त्यामुळे सुमारे ९० मिलियन भारतीयांची वैयक्तिक माहिती लिक होऊ शकते." तसेच यासाठी तुम्ही मला वैयक्तिकरित्या संपर्क करा असेही इलोइट अल्डरसन यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121