कोरोनानंतर आता 'आफ्रीकन स्वाईन फ्लू'चा भारतात शिरकाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020
Total Views |

assam_1  H x W:
गुवाहाटी : देशामध्ये कोरोणाचा भलमोठ राक्षस समोर उभा असताना आता नव्या रोगाची साथ देशामध्ये पसरते की काय? असा प्रश्न उभा राहिला आहे. नुकतेच 'आफ्रीकन स्वाइन फ्लू'चे पहिले प्रकरण आसाममधून समोर आले आहे. आसाम राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तेथील ७ जिल्ह्यातील ३०६ गावांमध्ये रविवारपर्यंत २,५०० पेक्षा अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे.
 
आसामचे पशुपालन मंत्री अतुल बोरा यांनी सांगितले की, “केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरही डुकरांना मारण्याचा निर्णय अद्याप घेतला जाणार नाही. या आजारापासून वाचण्यासाठी इतर पर्यायांचा शोध घेतला जात आहे. या आजाराचा कोरोनाशी काहीच संबंध नाही. माणसांवर याचा काहीच परिणाम होणार नाही.”
 
पुढे अतुल बोरा यांनी माहिती दिली की, “२०१९च्या आकडेवारीनुसार, राज्यात २१ लाखा डुकरे होती. जी वाढून ३० लाख झाली आहेत. आम्ही जानकारांशी चर्चा केली आहे की, आफ्रीकन स्वाइन फ्लू पासून डुकरांना कसे वाचवले जाऊ शकेल? ज्या डुकरांना अद्याप लागण झालेली नाही, अशा डुकरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संक्रमण असलेल्या परिसरातील एक किलोमीटर भागात सँपल घेतले जात आहेत. जे डुकरे संक्रमित असतील, त्यांनाच मारले जाणार आहे.”
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@