सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्याची प्रतीक्षा अखेर संपली !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2020
Total Views |

cbsc_1  H x W:



नवी दिल्ली
: सीबीएसई दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. मंडळाने आज दहावी आणि बारावी बोर्डाच्या प्रलंबित सीबीएसईची तारीख पत्रक जाहीर केले. दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा १ ते १५जुलै दरम्यान घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करत सांगितले आहे. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता १२वी व १०वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करत शुभेच्छा दिल्या.








सुधारित अधिसूचनेनुसार प्रलंबित विषयांसाठी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा १ जुलै ते १५ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहेत.सीबीएसईच्या १२वी होम सायन्स विषयाचा पेपर १ जुलै, बिझनेस स्टडीज ९ जुलै आणि बायोटेक्नॉलॉजी १० जुलै रोजी होणार आहे. तसेच भूगोलचा पेपर ११ जुलै रोजी होणार आहे. ईशान्य दिल्लीच्या ज्या भागात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या हिंसाचारामुळे बोर्ड परीक्षा विस्कळीत झाल्या होत्या.त्यापैकी १२वी चा भौतिकशास्त्राचा पेपर ३ जुलैला, अकाउंटन्सी ४ जुलैला आणि केमिस्ट्रीचा ६ जुलैला असेल. इयत्ता दहावीच्या प्रलंबित परीक्षांचे १ जुलैपासून वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. पहिला पेपर सोशल सायन्सचा असेल तर शेवटचा पेपर इंग्रजीचा असेल. १० जुलै रोजी हिंदीच्या दोन्ही कोर्सेसची परीक्षा घेण्यात येणार असून १५जुलैला इंग्रजीच्या दोन्ही कोर्सेससाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. विषय आणि नवीन परीक्षेच्या तारखांची संपूर्ण यादी खाली दिली आहे. केंद्रीय विद्यालयाच्या या परीक्षा कोरोना लॉकडाऊनमुळे तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आल्या होत्या. सीबीएसई सचिव अनुराग तिवारी यांनी हा निर्णय जाहीर केला होता. म्हणजेच, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जेईई आणि नीट परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कारण, जेईई परीक्षा १८ जुलैपासून सुरु होत असून नीट २०२० परीक्षेचं नियोजन २६ जुलै २०२० रोजी करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@