सीएपीएफ कॅंटीनमध्ये आता केवळ स्वदेशी उत्पादनांची विक्री : केंद्रीय गृह मंत्रालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2020
Total Views |

CAPF_1  H x W:



नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा दिली. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे की, १ जूनपासून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील सर्व कॅन्टीन (सीएपीएफ) केवळ स्वदेशी उत्पादने विकतील.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणतात, "काल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे आवाहन केले. तसेच भारतीय नागरिकांनी स्थानिक उत्पादनांचा (भारतातील उत्पादित वस्तू) वापर करण्याचे आवाहन केले जे आगामी काळात भारताला जगाचे नेतृत्व करण्यासाठीचा मार्ग निश्चितच सुकर करेल."




“आज या दिशेने गृहमंत्रालयाने निर्णय घेतला आहे की सर्व सीएपीएफ कॅन्टीन आणि स्टोअर आता फक्त स्वदेशी उत्पादने विकतील. हा नियम १ जून २०२०पासून देशभरातील सर्व सीएपीएफ कँटीनना लागू असेल. या कॅन्टीनची एकूण खरेदी सुमारे २८०० कोटी रुपये. यातून सुमारे १० लाख सीएपीएफ जवानांचे जवळपास ५० लाख कुटुंबीय स्वदेशी वस्तूंचा वापर करतील. अमित शाह पुढे म्हणाले, "देशात बनवलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करावा आणि इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहित करावे, असेही मी देशातील लोकांना आवाहन करतो."



केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढे असे प्रतिपादन केले की, प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे वचन दिले तर पाच वर्षांत देशातील लोकशाही स्वयंपूर्ण होऊ शकते. स्वदेशी उत्पादनांचा वापर करून स्वावलंबी भारताच्या या प्रवासात आपण सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देऊया " दरम्यान पंतप्रधानांनी मंगळवारी देशाला "आत्मनिर्भर" होण्यासाठी आणि कोरोना संकटाच्या काळात आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@