‘गुगलीफाय’ मांडतंय एकविसाव्या शतकाचं वास्तव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Mar-2020
Total Views |
googlyfy_1  H x


‘गुगलीफाय’ नाटकाला प्रेक्षक आणि कलाकारांचा उत्स्फुर्द प्रतिसाद!


मुंबई : रंगभूमीवर सध्या अनेक वास्तववादी नाटकांची निर्मिती होते आहे. समाज आणि समाजभान जपायला लावणारी ही नाटकं प्रेक्षकांच्या मनाला भावतात आणि त्यामुळे या नाटकांना त्याची पसंतीदेखील मिळते. अशाच एका वास्तववादी नाटकाची सध्या रंगभूमीवर चर्चा आहे.


‘गुगलीफाय’ या मनश्री आर्ट्स निर्मित नाटकातून एकविसाव्या शतकाच्या तरुणाईचं वास्तव अतिशय गंभीरपणे अधोरेखित केलं गेलं आहे. एकोणिसाव्या शतकातली पिढी म्हणजेच आपले आई-बाबा, आजी-आजोबा वगैरे यांना सगळ्या गोष्टी अगदी सहज आठवतात. अगदी तुम्ही कोणत्याही नातेवाईकाचा पत्ता विचारलात तर ते तुम्हनाला त्यांच्या मोबाईल नंबरसह सांगू शकतात. म्हणजे त्यांच्या काळात मोबाईल आणि मुळात ‘गुगल’ नसल्याचा हा परिणाम! मात्र आजची पिढी, म्हणजेच एकविसाव्या शतकाची ‘इंटरनेट पिढी’! सगळ काही गुगलला विचारून करणारी... टेक्नोलॉजी हा या पिढीचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय... पण याच्या आहारी जाऊन आपली पिढी स्मरणशक्ती आणि नाती या दोन्ही गोष्टी तर गमावत नाहीय ना? याच गंभीर वास्तववादी विषयावर ‘गुगलीफाय’ हे नाटक भाष्य करतं. ‘गुगल’च्या आहारी गेलेली नायिका आणि त्यातून तिला बाहेर काढू इच्छिणारा नायक यांची ही कथा! नाटक सुरु असताना नाटकाचे बरेच प्रसंग प्रेक्षक स्वानुभव म्हणूनही स्वतःशी जोडून पाहताना दिसतात. यामुळेच प्रेक्षक या नाटकाशी जोडला जात आहे.


चैतन्य सरदेशपांडे लिखित ‘गुगलीफाय’ या नाटकाचे दिग्दर्शन अमर कुलकर्णी यांनी केले आहे. पूजा कातुर्डे आणि चैतन्य सरदेशपांडे यांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ‘राजा परांजपे करंडका’त द्वितीय पारितोषिक कमावलेल्या या नाटकाचा पुढचा प्रयोग येत्या ६ मार्च रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@