कोरोनामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी संकटात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020
Total Views |
 
 
 
लासलगाव : कोरोनामुळे विक्रीअभावी साडेपाच महिने उलटूनही शेतात असलेल्या द्राक्षेबागा वाचवा अशी आर्त हाक येथील बाळासाहेब आवारे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे दूरध्वनीद्वारे केली आहे.यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून शेतीविषयक प्रश्नांची तातडीने सोडवणूक करू असे आश्वासनही दिले.
 
 
बाळासाहेब आवारे यांनी जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के द्राक्षे बागा अजूनही शिल्लक आहेत.मात्र द्राक्षेमालाच्या गाड्या अडवल्या जातात त्यामुळे द्राक्षे व्यापारी यांनी द्राक्षे काढणी बंद केली आहे.स्थानिक मालासाठी १० रुपये किलो तर निर्यातक्षम द्राक्षे उत्पादनासाठी १५ रुपये प्रतिकिलो खर्च येतो मात्र काही व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करून १० रु किलोने द्राक्षे मागणी करत आहेत.शहरात द्राक्षे विक्री व्यवस्था नसल्याचे व्यापारी कारण सांगत आहेत.त्यामुळे द्राक्षे उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून द्राक्षे उत्पादक शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकतो अशी समस्या राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मांडली.
 
 
यावर दादा भुसे यांनी भाजीपाला,दूध,फळे आदी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर कुठलेही बंधन नाही.गुजरात व धुळे सीमारेषेवर अत्यावश्यक वस्तूंच्या गाडया अडवू नये असे जिल्हा पोलिस अधीक्षकांना आदेश दिले आहेत.शहरातील गल्ली बोळात हातगाड्यांवर विक्री करणाऱ्यांनी नोंदणी केल्यास परवानगी दिली जाईल असे सांगितले.एकूणच शेतमाल विक्री व वाहतुकीसंदर्भात कुणाला काही अडचण आल्यास थेट संपर्क साधण्याचेही आवाहन त्यांनी केले. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील द्राक्ष बागा संकटात असल्याचे चित्र सध्या स्दिसून येत आहे.
@@AUTHORINFO_V1@@