जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोनाचा मनोरंजन क्षेत्रालाही जबर फटका!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2020
Total Views |
cororna_1  H x





अनेक मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण रद्द; नाटकं आणि चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या

मुंबई : कोरोना व्हायरसच्या फैलावाची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चित्रपटसृष्टीलाही कोरोना व्हायरसची भीती सतावते आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा फटका चित्रपटसृष्टीलाही सहन करावा लागत आहे.


दिल्ली, मुंबई, कर्नाटक, केरळ, जम्मू आणि काश्मीरमधली चित्रपटगृह, नाट्यगृह काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक मोठ्या कलाकारांनी आपले प्लॅन बदलले आहेत. अनेक चित्रपटांचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्याचबरोबर नाटकाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लागलेले नाटकाचे शो ही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नाट्यनिर्मात्यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.


परदेशातील शूटिंग रद्द

झोया अख्तर आणि रीमा कागती यांची अमेझॉन प्राईमवरची 'मेड इन हेवन' ही वेबसीरिज बरीच लोकप्रिय झाली होती. या वेबसीरिजचे दुसरे पर्व 'मेड इन हेवन २'चे शूटिंग लवकरच युरोपात सुरू होणार होते. मात्र, हे शूटिंग आता रद्द करण्यात आले आहे. 'सितारा' या चित्रपटाचे केरळात होणारे चित्रीकरण रद्द करण्यात आले आहे. सलमान खानच्या 'राधे' चित्रपटाचे चित्रीकरणही काही काळ रद्द करण्यात आले आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट परदेशात चित्रित होणार होता. मात्र, आता मुंबईत चित्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चे चित्रीकरण राजस्थान ऐवजी आता मुंबईत होणार आहे. करण जोहरच्या 'तख्त' चित्रपटाचे जयपूर आणि जयसलमेरमध्ये होणारे चित्रीकरणही रखडले आहे.
@@AUTHORINFO_V1@@