महेश मांजरेकर दिसणार वस्तादाच्या भूमिकेत!

    15-Feb-2020
Total Views | 90
kesari_1  H x W




‘केसरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

मुंबई : ‘केसरी- Saffron’ या मराठी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कुस्ती या मातीतील खेळाभोवती फिरणाऱ्या केसरी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातून मुळचा कोल्हापूरचा असलेला विराट मडके हा नवीन चेहरा मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे.


या चित्रपटात महेश मांजरेकर कुस्ती वास्तदाच्या दमदार भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, मोहन जोशी यांच्यासह प्रवीण तरडे, उमेश जगताप, छाया कदम, जयवंत वाडकर, नंदेश उमप, नचिकेत पूर्णपात्रे, सत्यपा मोरे, ज्ञानरत्न अहिवळे, रूपा बोरगावकर, पद्मनाभ बिंड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.





केसरी ही एका सामान्य मुलाची संघर्षकथा आहे. चित्रपटाच्या नायकाची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. मात्र त्याच्या वडिलांचा कुस्ती खेळण्यास विरोध आहे. गावातले लोकही त्याच्या कुस्तीच्या विरोधात आहेत. नायक मात्र विजयी झाल्याशिवाय घरात पऊल न टाकण्याची शपथ घेतो. असे या ट्रेलरमधून दिसते आहे. चित्रपटाचे लेखन नियाज मुजावर यांनी केले असून, संकलन व दिग्दर्शन सुजय डहाकेचे आहे. २८ फेब्रुवारीला या चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121