कर्तव्यदक्ष नेता...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020   
Total Views |

Pravin Darekar  _1 &




कोविडचा काळ हा केवळ जनतेचीच नव्हे, तर सरकार आणि लोकप्रतिनिधींचीही सर्वार्थाने परीक्षा पाहणारा होता. या संकटसमयीच जो जनतेच्या मदतीला धावून जातो, तोे कर्तव्यदक्ष नेता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे त्यापैकीच एक. गरजूंना मदत असो ‘निसर्ग’ चक्रीवादळातून कोकणवासीयांना दिलासा द्यायचा असो, दरेकर यांनी जनतेला सर्वार्थाने आधार दिला. अशा या ‘कोविड योद्ध्या’च्या कार्याचा परिचय करुन देणारा लेख...
 
 
 
नाव : प्रवीण दरेकर
 
पक्ष : भारतीय जनता पक्ष
 
पद : विरोधी पक्षेनेते, विधान परिषद
 
 
लोकांचे प्रश्न सरकारसमोर मांडणारा तो लोकप्रतिनिधी. पण, या लोकप्रतिनिधीने केवळ सरकारसमोर प्रश्न मांडणे पुरेसे नसते, तर प्रत्यक्ष मैदानात उतरुन त्या प्रश्नांची तीव्रता समजून घेणे, आपल्या स्तरावर उपाययोजना करणे, मग सरकार दरबारी ते प्रश्न मांडणे व त्यांचा कसून पाठपुरावा करणारा तो खरा लोकप्रतिनिधी. प्रवीण दरेकर या व्याख्येत अगदी तंतोतंत बसतात. त्यांनी खासकरुन कोरोनाच्या काळात जनतेला सर्वोपरी मदत करुन दिलासाच दिला नाही, तर अवघ्या राज्याशी संबंधित मूलभूत प्रश्नांना वाचा फोडली. प्रसंगी आक्रमक होत सरकारला जाबही विचारला. कारण, प्रश्न जनहिताचा होता!
 
 
राज्यातील कोविडचे संकट, कोकणातील ‘निसर्ग’ वादळ अथवा अतिवृष्टीचे संकट असेल, जनसामान्य, कोकणवासीय, कष्टकरी, बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी दरेकर यांनी अवघा महाराष्ट्र पालथा काढला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांबरोबरच राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या व भोंगळ कारभाराला दरेकरांनी वेळोवेळी चव्हाट्यावर आणले. विधिमंडळात कायदा व सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न, कोकणवासीयांचे प्रश्न, चाकरमान्यांच्या समस्या, कष्टकरी कामगारांचे प्रश्न, मुंबईकरांच्या समस्या आदी विविध प्रश्नांनी त्यांनी सरकारला धारेवर धरले.
 
 
"माझ्या मनात एकच स्फूर्ती होती की, कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे. पण, सरकारद्वारे आलेल्या आपत्तीतून जनतेला बाहेर काढावे. आजही अथकपणे सेवक म्हणून हे कार्य सुरुच आहे. यापुढे सुरु राहणार आहे. खरं म्हणजे मी निमित्तमात्र आहे. कार्यकर्त्यांचं बळ, भाजपने दाखवलेला विश्वास, मोदीजींची सेवक प्रणाली, देवेंद्रजी, चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला हे साध्य होऊ शकले."
 
 
तसेच प्रवीण दरेकर जनअपेक्षेच्या कसोटीवरही नेहमीप्रमाणेच खरे उतरले. आपल्या आरोग्याची कुठलीही पर्वा न करता, केवळ आपला मतदारसंघच नव्हे, तर राज्यभरात त्यांनी दौरे केले. ज्या-ज्या ठिकाणी ऑक्सिजन, पीपीई किट्स, अत्यावश्यक इंजेक्शन यांची कमतरता होती, त्या त्या ठिकाणी पोहोचून दरेकर यांनी तातडीने ती उपलब्ध करुन दिली व शेकडो कोविड रुग्णांचे प्राण वाचविले. कोविड सेंटरमधील भोंगळ कारभाराच्या विरोधात जाब विचारताना त्यांनी तेथील डॉक्टर्स, परिचारिका व अन्य वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या कमतरतेचा विषयही ऐरणीवर आणला.
 
 
प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या थेट ‘ऑन द स्पॉट’ संपर्क करुन कोविड सेंटरमधील असुविधा दूर करुन लाखो कोविड रुग्णांना दिलासा दिला. कोविडच्या प्रारंभी ‘लॉकडाऊन’च्या काळात मागाठाणे विधानसभा मतदारसंघात, तसेच मुंबईतील विविध भागांत किचन सेवा, धान्यवाटपाची सुरुवात केली. कामगार, फेरीवाले, मजदूर यांच्यासह मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आदींना त्यांनी मदतीचा हात दिला. दरेकर यांची ही मदत ‘लॉकडाऊन’च्या काळात अव्याहतपणे सुरुच होती.
 
 
कोविडच्या काळात कोकणवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी दरेकर यांनी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना संकटकाळात प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरत, तेथे योग्य व्यवस्था तातडीने सुरु केल्या. तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरात स्थानिक महापालिकांच्यामार्फत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरना भेटी देऊन दरेकर यांनी ‘ग्राऊंड रिअ‍ॅलिटी’ जाणून घेतली. तसेच कुर्ला, मालाडमधील काही रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना लुटणार्‍या व कोविडमध्ये मृत पावलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या मुजोर रुग्णालय व्यवस्थापनालाही चांगलाच धडा शिकवला. त्यामुळे लाखो रुपयांचे बिल दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केलेल्या आंदोलनामुळे कमी करण्यात आले. दरेकर यांनी हा प्रश्न लावून धरल्यामुळे कोविड रुग्णांची काही रुग्णालयांकडून होणारी वारेमाप लुटमार थांबली व शेकडो रुग्णांना न्याय मिळाला.
 
 

Pravin Darekar  _2 &

"माझ्या मनात एकच स्फूर्ती होती की, कोरोना ही नैसर्गिक आपत्ती आहे. पण, सरकारद्वारे आलेल्या आपत्तीतून जनतेला बाहेर काढावे. आजही अथकपणे सेवक म्हणून हे कार्य सुरुच आहे. यापुढे सुरु राहणार आहे. खरं म्हणजे मी निमित्तमात्र आहे. कार्यकर्त्यांचं बळ, भाजपने दाखवलेला विश्वास, मोदीजींची सेवक प्रणाली, देवेंद्रजी, चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला हे साध्य होऊ शकले."
 
 
कोविडच्या संकटकाळात ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा कोकणला जोरदार तडाखा बसला. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. मग काय, कोकणचे सुपुत्र असलेल्या दरेकर यांनी सर्वप्रथम रातोरात कोकण गाठले. चक्रीवादळामुळे वाताहत झालेल्या जिल्ह्यांची भेट घेतली. पहिल्यांदा स्वत: दौरा केला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने कोकणचा संपूर्ण दौरा केला. उद्ध्वस्त झालेले कोकण पुन्हा उभारण्याच्या दृष्टीने तेथील स्थानिक प्रशासन, तसेच सरकारशी संघर्षाची भूमिका घेत कोकणवासीयांना त्यांनी न्याय मिळवून दिला. आंबा, नारळ, सुपारी, भातशेतींच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांना दिल्या. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या घरांच्या पुनउर्भारणीसाठी लागणारी सर्व शासकीय मदत दरेकर यांनी मिळवून दिली. एवढेच नव्हे, तर भाजपच्या माध्यमातून कोकणवासीयांना मदतीचा हातही देण्यात आला.
 
 
कोकणाला चक्रीवादळाने, तर मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. बळीराजा संकटात सापडला असताना दरेकर यांनी अतिवृष्टीची तमा न बाळगता थेट मराठवाडा गाठला. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दु:ख समजावून घेतले. दरेकर यांनी औरंगाबद, परभणी, हिंगोली, जालना, बीड आदी जिल्ह्यांचा दौरा करीत नुकसान झालेल्या जमिनीची व शेतीची पाहणी केली. तेथील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. एवढेच नाही तर स्वत: शेतकर्‍यांशी बांधावर जाऊन त्यांनी संवाद साधला. दरेकर यांनी या हजारो शेतकरी कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. ‘ऑन द स्पॉट’ महसूल, कृषी अधिकार्‍यांना तातडीने पाचारण करुन शेतकर्‍यांच्या शेती व जमिनीचे पंचनामे करुन घेतले. शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर 50 हजार रुपये देण्याची आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात भेट देऊन दरेकर यांनी तेथील जिल्हाधिकार्‍यांपर्यंत शेतकर्‍यांच्या तीव्र भावना पोहोचविल्या.
 
 
याच दरम्यान रोहा व पुणे-तळेगाव येथे अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्यानंतर दरेकर यांनी तातडीने त्या ठिकाणी भेटी देऊन आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली. एवढेच नव्हे, तर राज्यातील महिला व अत्याचारांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज उठविला. गणपतीमध्ये गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांचे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रचंड हाल झाले. कोकणात जाण्यासाठी सरकारकडून ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवर चाकरमान्यांची अडवणूक केली जात होती. परंतु, दरेकर यांनी या प्रश्नावर पाठपुरावा करुन गणपतीमध्ये कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना दिलासा दिला.
मुंबई आणि परिसरात इमारती पडण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. त्यावेळीही दरेकर प्रत्येक दुर्घटनास्थळी जातीने हजर होते. तेथील मदतकार्यात त्यांनी सूचना दिल्या. त्याचप्रमाणे येथील दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळविण्याचा आग्रह शासनाकडे धरला. अशा या महामारीच्या संकटकाळात प्रवीण दरेकर यांनी सदैव जनतेच्या प्रश्नांना आणि त्यांच्या गरजांना प्राधान्य दिले. राज्याच्या कानाकोपर्‍यात पायपीट करुन जनतेला आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वास दिला आणि तो सार्थही करुन दाखवला. आपल्यातील कर्तव्यपरायणतेला दरेकर यांनी सर्वोच्च स्थान देत, सेवाकार्यात तत्परता दाखविली. अशा या समाजमन जाणणार्‍या आणि जगणार्‍या ‘कोविड योद्ध्या’च्या कार्याला सलाम!
@@AUTHORINFO_V1@@