सहकारातील सकारात्मक व्यवस्थापन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020
Total Views |

co op_1  H x W:
 
 
सहकार क्षेत्राचा चढता आलेख व वाढता व्याप याआधारे सहकार क्षेत्रात आवश्यक अशी व्यवस्थापन पद्धती व रचनाही निर्माण झालेली दिसते. त्याचा या लेखात घेतलेला हा मुद्देसूद आढावा...
 
 
सहकार क्षेत्र हे आपल्या वाढत्या व बदलत्या आर्थिक रचनेमुळे अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे क्षेत्र ठरले आहे. समाजात सहजगत्या व स्वाभाविक पद्धतीने रुजलेल्या सहकार क्षेत्राला आता केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक संदर्भातही आता सर्वदूर मान्यता मिळते. आज बँकिंग, आर्थिक सेवा, व्यवहार ग्राहक क्षेत्र, उत्पादन, गृहनिर्माण याशिवाय विविध व्यवसायांमध्ये सहकाराने केवळ शिरकावच केला नसून आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थानसुद्धा निर्माण केले आहे. तेव्हा, या सहकार क्षेत्राचा हा चढता आलेख व वाढता व्याप याआधारे सहकार क्षेत्रात आवश्यक अशी व्यवस्थापन पद्धती व रचनाही निर्माण झालेली दिसते. या व्यवस्थापन पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे, संस्थागत स्वरुपात व संंबंधित सहकारी संस्थेच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी विकसित झालेली व्यवस्थापन पद्धती. त्यामुळे आपल्याकडील सहकार क्षेत्रातील व्यवस्थापन पद्धतीमध्ये आपल्याला लवचिकता, कालानुरुपता व पूर्वानुभांवर आधारित असे विकासनशील स्वरुप यांचा त्रिवेणी संगम दिसून येतो.
या पार्श्वभूमीवर व बदलती परिस्थिती आणि व्यावसायिक स्पर्धा, कार्यपद्धती व सहकारी धोरणांची सांगड घालून, स्पर्धेच्या युगात अधिकाधिक व परिणामकारक ग्राहकोपयोगी सेवा देण्यासाठी आज सहकारातील व्यवस्थापनाला सकारात्मक कार्यपद्धतीची जोड देणे अनिवार्य ठरले आहे, यासंदर्भात खालील मुद्द्यांचा विचार करणे गरजेचे ठरते. सहकारातील व्यवस्थापन पद्धती व कार्यशैली यांचा विचार करताना, सहकार क्षेत्राशी संबंधित सरकार, समाज व ग्राहक, संस्थांचे पदाधिकारी-व्यवस्थापन, अधिकारी व कर्मचारी या घटकांचा प्रामुख्याने विचार करणे अपरिहार्य ठरते. अशाप्रकारे विचार करताना, एक मूलभूत व महत्त्वपूर्ण विचार म्हणजे, समाजपूरक सहकार व ग्राहकप्रवण सहकारी संस्था. त्याचबरोबर आर्थिक व्यवसाय-व्यवहारांच्या जोडीलाच मानवी पैलू पण समानस्वरुपात महत्त्वाचे ठरतात. सहकारातील व्यवहार, त्याचे व्यवस्थापन अधिकाधिक प्रमाणात व्यवसायप्रवण, पारदर्शी, सर्वसमावेशक, परस्परपूरक स्वरुपात साकारण्यासाठी खालील मुद्दे चिंतनीय ठरतात.
 
सहकाराची व्यापकता व अपरिहार्यता
 
अनेक आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जात सहकाराने आपले व्यापक स्वरुप व त्याची अपरिहार्यता टिकवून ठेवली आहे. अगदी खुली आर्थिक व्यवस्था, जागतिकीकरण, थेट गुंतवणूक, विविध धोरणात्मक निर्णय या समस्यांवर मात करीत सहकार क्षेत्राने आपले स्थान आणि स्थैर्य केवळ टिकवूनच ठेवले, असे नव्हे, तर अर्थ-व्यवसाय जगातील विविध पैलूवर त्याला व्यापक स्वरुप देत आपली सर्वकालीन आवश्यक अशी अपरिहार्यता सिद्ध केली आहे.
 
बदलत्या व विविध आर्थिक गरजांची जपणूक आणि पूर्तता
सहकार क्षेत्राचा समाजाच्या सर्व स्तरांशी असणारा सहज-सुलभ सामाजिक संपर्क, जवळीकतेमुळे समाजातील ग्रामीण, निमशहरी, प्रगत व्यावसायिक, विद्यार्थी, महिला, लघु व मध्यम उद्योजक, मोठे व्यावसायिक या संस्थांच्या बहुस्तरीय गरजांची पूर्तता करु शकणे, हे देखील सहकार क्षेत्राचे बलस्थानच समजले पाहिजे. वर नमूद केल्याप्रमाणे आज सहकाराची व्यापक उपयुक्तता, सर्वकालीन अपरिहार्यता व ग्राहकाभिमुख व्यावसायिकतेच्या संदर्भातील पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थात्मक व व्यवस्थापन पद्धतीला बदलल्या कालानुरुप अशा नव्या कार्यपद्धतीची साथ लाभल्यास, त्याचे अनेकार्थांनी सकारात्मक परिणाम होऊ शकतात.
 
त्यासाठी सहकार व्यवस्थापनात कालानुरुप बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सहकार क्षेत्रातील संस्थागत बांधणी, उभारणी व मूलभूत कार्यपद्धती, संस्थेची मूल्यनिश्चिती व त्यांची जपणूक, प्रतिमानिर्मिती, मूल्याधारित व्यवस्था वाढ, ग्राहककेंद्रित कारभार, कर्मचारीप्रवण कार्यपद्धती यांचा उल्लेख करता येईल. म्हणूनच सहकाराशी संबंधित घटकांसाठी परस्परपूरक कार्यपद्धती व कार्यशैली उपलब्ध करुन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी खालील व्यवस्थापन सूत्र मार्गदर्शक ठरते.
 
 
 
co op_1  H x W:
 
 
तक्ता क्र. १ खालील प्रमुख व निवडक सात मूल्यांची संक्षिप्त तपशिलासह मांडणी अशा प्रकारे करता येईल.
 
संस्थागत मूल्ये : संस्थेच्या स्थापना कार्यकर्तृत्वाला मूल्यांचा म्हणजेच विशिष्ट तत्त्वांचे पाठबळ प्राप्त करुन देणे व त्यानुसार दिशानिर्देश देणे.
 
ग्राहकाभिमुख व्यावसायिकता : व्यावसायिक क्षेत्राप्रमाणेच सहकार क्षेत्रालाही ग्राहकप्रधान बनविणे व संस्थेचा व्यावसायिक प्राधान्यक्रम कायम राबवणे.
 
कार्यपद्धती व कार्यप्रणाली : सहकारी संस्थांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आणि महत्त्व लक्षात घेता, संस्थेच्या विविध व बदलत्या गरजांनुरुप संबंधित संस्थेची कार्यपद्धती व तिच्या अंमलबजावणीसाठी ध्येय-धोरण निश्चित करणे.
 
कार्यक्षम व प्रशिक्षण कर्मचारी : इतर सर्वच व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्राप्रमाणे कर्मचारी ही संबंधित संस्थेची जमेची बाजू असते व कर्मचारी प्रशिक्षित-कार्यक्षम असल्यास व्यवसायवाढ सहजशक्य असते.
 
सातत्यपूर्ण संवाद : संवाद हा व्यवसायाचा गाभा असतो व सातत्यपूर्ण संवाद ही प्रत्येक संस्थेप्रमाणेच सहकारी संस्थेची पण गरज असतेच.
 
 
 
chart_1  H x W:
 
 
 
सामाजिक संदर्भ आणि योगदान : सहकार क्षेत्र हे मूलत: सामाजिक स्वरुपाचे असते व त्यामुळे या संस्थांना समाजिक संदर्भाचा आधार महत्त्वाचा ठरतो.
 
पडताळणी व पाठपुरावा : प्रत्येक व्यवस्थापन पद्धतीनुसार सहकाराच्या कार्यपद्धतीचा पण त्याची पडताळणी व पाठपुराव्याची जोड अपरिहार्य ठरते.
 
एकूणच, आर्थिक विषयांशी जनसामान्यांच्या माध्यमातून निगडित अशा सहकार क्षेत्राला आज इतर सर्व व्यावसायिक क्षेत्रांप्रमाणेच विविध प्रकारच्या व्यावसायिक स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. त्याशिवाय बदलती सरकारी, बँकिंगविषयक धोरणे निर्देश व त्यांचे पालन ग्राहकांच्या स्वाभाविकपणे वाढणाऱ्या अपेक्षा, स्पर्धात्मक कार्यपद्धती यांचेही आव्हान समोर आहेच. मर्यादित संसाधनांच्या माध्यमातून विविध व्यावसायिक उद्दिष्ट गाठणे व त्याचबरोबर पारदर्शी व परस्परांच्या विश्वासावर आधारित व्यवसायात आपली वाढ आणि अपेक्षित यश टिकवण्यासाठी, समाजहितैशी काम करणाऱ्या सहकारी क्षेत्रातील संस्थांना औपचारिक व प्रगत व्यवस्थापन पद्धतीची जोड मिळणे ही बदलत्या व्यावसायिक परिस्थितीनुरूप काळाची गरज ठरली आहे, हे निश्चित!
 
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापन-मार्गदर्शक आहेत.)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@