ऑस्करच्या शर्यतीत 'जल्लीकट्टू'ची एन्ट्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2020
Total Views |

jallikattu_1  H
 
 
नवी दिल्ली : ऑस्कर पुरस्कार मिळवणे हे जगभरातील सर्व कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट असते. जगभरातील असंख्य चित्रपटांमधून काही निवडक पण सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. अनेकवेळा भारतानेदेखील ऑस्करमध्ये आपली छाप पाडली आहे. यावेळी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी भारतातील मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू'ची निवड केली गेली आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये या चित्रपटाने कौतुकाची थाप मिळवली आहे. त्यामुळे यंदाचा ऑस्कर हा या चित्रपटामुळे भारतासाठी विशेष ठरतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
गेली काही वर्ष भारतीय चित्रपट तसेच भारतीय कलाकार ऑस्कर सोहळ्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जल्लीकट्टू' या चित्रपटाचे प्रेक्षकांसह परीक्षकांनीदेखील कौतुक केले. यानंतर आता ९३व्या अकादमी पुरस्कारामध्ये नामांकन होणे, ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. भारताकडून एकूण २७ चित्रपट पाठवण्यात आले होते. यामध्ये अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा 'गुलाबो सिताबो', सफदर रहना यांचा 'चिप्पा', हंसल मेहता यांचा 'छलांग', चैतन्य ताम्हणे यांचा 'द डिसाइपल', विधू विनोद चोप्रा यांचा 'शिकारा' सत्यांशु-देवांशु यांचा 'चिंटू का बर्थडे' असे अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक चित्रपटांचा समावेश होता.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@