'सहारा'चा 'सेबी'वर गंभीर आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2020
Total Views |

SEBI_1  H x W:
 
 


नवी दिल्ली : सहारा ग्रुपने भांडवली बाजार नियामक सेबीवर गंभीर आरोप लावले आहेत. आम्ही आठ वर्षांत सेबीला एकूण २२ हजार कोटी रुपये दिले आहेत. मात्र, गुंतवणूकदारांना केवळ १०६.१० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, असे म्हणणे आहे. सहारा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
 
 
 
वृत्तपत्रांमध्ये दिली जाहिरात
 
सहारा इंडिया परिवारतर्फे अग्रगण्य वृत्तपत्रांमध्ये जाहिरात दिली आहे. कंपनी प्रमुख सुब्रतो राय सहारा इंडिया परिवाराविरोधात एक आरोप आहे. आम्ही गुंतवणूकदारांचा पैसे परत करण्यासाठी असमर्थ ठरलो आहोत. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी आम्ही उशीर करत आहोत. मात्र, आम्ही याचे व्याजही देत आहोत.
 
 
 
आठ वर्षांपासून प्रकरण प्रलंबित
 
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठ वर्षांपासून जे नियम आखून दिले आहेत. त्यानुसार संपत्ती विकून पैसे परत केले जात आहे. कंपन्यांच्या संपत्तीची विक्री केल्यानंतर येणारा पैसा हा सेबीच्या खात्यात जमा करण्यासाठी सहाराला सांगण्यात आला आहे. सहाराच्या आरोपानुसार सेबीने आठ वर्षांत एकही पैशाचा उपयोग केलेला नाही.
 
 
सहाराने सांगितल्यानुसार, २२ हजार कोटी रुपये आतापर्यंत भरले आहेत. त्यात व्याजाचाही सामावेश आहे. ही संपत्ती दोन समुह कंपन्यांच्या बॉण्ड धारकांना परत करण्यासाठी जमा केली आहे. सेबीने गेल्या आठ वर्षांत चार टप्प्यांमध्ये १५४ वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे. तरीही १०६ कोटींचेच वितरण गुंतवणूकदारांना करण्यात आले आहे. सहारा समुहाच्या मते, त्यांच्या या दाव्यानुसार कोणाचेही पैसे थकलेले नाहीत.
 
 
 
समुहाच्या मते, पैसे परतवण्यासाठी कुठलाही दावेदार शिल्लक नाही. कंपनीने जास्तीत जास्त बॉण्डधारकांना त्यांचे पैसे परत केले आहेत. सहारा समुहाने अशा चार को ऑपरेटीव्ह सोसायट्यांमध्ये चार कोटी गुंतवणूकधारकांचे पैसे जमा केले आहे. त्यापैकी एकूण ८६ हजार ६७३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहे. त्यापैकी ६२ हजार ६४३ कोटी रुपये अँबी व्हॅली लिमिटेडमध्ये गुंतवण्यात आले आहेत.
 
 
फेब्रुवारीतील आकडेवारीनुसार १५ हजार ४४८ कोटी केले परत
 
यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये सहाराने १५ हजार ४४८ कोटी रुपये जमा केले होते. ही सेबी-सहारा रिफंड अकाऊंटमध्ये जमा केली आहेत. सहारा इंडिया रियल एस्टेटने १९ हजार ४००.९७ कोटी रुपये आणि सहारा हाऊसिंग इनव्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ६ हजार ३८९.५० कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून जमा केले होते.


@@AUTHORINFO_V1@@