गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी ऋषीकेश देवडीकर याला विशेष तपास पथकाने अटक केली आहे. याआधी विशेष तपास पथकाने १७ जणांना अटक केली आहे. झारखंडमधील धनबाद येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ऋषीकेश देवडीकर उर्फ मुरली (वय ४४) याला झारखंडमधील धनबाद जवळील कटरास येथून गुरुवारी अटक करण्यात आली, अशी माहिती विषेश तपास पथकाचे अधिकारी एम. एन अनुचित यांनी सांगितले.

 

देवडीकर कटासर येथे दुर्गम स्थळी ओळख लपवून राहत होता. ऋषिकेश, राजेश, मुरली, शिवा अशी खोटी नावे सांगून तो राहत होता. अटक केल्यानंतर पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. शुक्रवारी त्याला जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर करण्यात येणार आहे. गौरी लंकेश हत्येप्रकरणी देवडीकर हा प्रमुख आरोपी होता, अशी माहिती पोलिासांनी दिली. ५ सप्टेंबर २०१७ ला बंगळुरूमधील राजेश्वरीनगर भागातील घरी गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. आत्तापर्यंत १८ जणांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@