प्रयत्न करणारे कधीच हरत नाहीत : पंतप्रधानांचा इस्रोला धीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2019
Total Views |



बंगळुरू : अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या चांद्रयान २ मोहिमेकडे लागले होते. परंतु, शनिवारी पहाटे विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यामुळे चांद्रयान -२ खाली उतरण्यामध्ये अडथळा निर्माण झाला. २.१ किमी अंतरावर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. संपर्क पुन्हा सुरळीत होण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.

 

कसा होता रात्रीचा घटनाक्रम?

 

- रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली.

- चंद्राच्या पृष्ठभागापासून यानाचं अंतर जसजस कमी होत होते. तसे सर्वांची धाकधूक वाढली होती. संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला गेला होता.

- इस्रो सेंटरमधील शास्त्रज्ञ विक्रम लँडरच्या मार्गक्रमणावर बारकाईने लक्ष ठेऊन होते.

- १ वाजून ५३ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, चांद्रयान अवघे २.१ कि.मी.वर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला.

 

पंतप्रधानांचा शास्त्रज्ञांना धीर

 

विक्रम लॅण्डरशी संपर्क तुटल्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसह देशभरातील नागरिक निराश झाले आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र इस्रोच्या शास्त्रज्ञांची पाठ थोपाटत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. शास्त्रज्ञांची पाठ थोपाटताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आयुष्यात अनेकदा यश-अपयश मिळत असते. तुम्ही (इस्रोने) या मोहीमेद्वारे जे साध्य केले आहे ते यश छोटे नाही. मला आणि देशाला तुमचा अभिमान आहे." मोदींनी शास्त्रज्ञांची पाठ थोपाटली, तसेच त्यांना पुढील कामांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोदी म्हणाले की, "तुम्ही या मोहीमेद्वारे देशासाठी, विज्ञानासाठी आणि मानवजातीसाठी खूप मोठे काम केले आहे. मी तुमच्यासोबत आहे, हिंमत राखा, तुमच्या प्रयत्नांनी देश खूप आनंदी होईल."

@@AUTHORINFO_V1@@