नव्या वाहतूक नियमांमुळे विमा कंपन्यांचा 'सर्व्हर डाऊन' : वाचा नेमके प्रकरण काय ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Sep-2019
Total Views |
 
 

वाहन विमा व्यवसाय तेजीत



नवी दिल्ली : वाहतूक नियम मोडणाऱ्यांना चाप बसावा या दृष्टीने लागू करण्यात आलेल्या नव्या नियमावलीला सर्वसामान्यांकडून वरवर विरोध जरी होत असला तरीही आता सर्वसामान्य जनता वाहतूक नियमावलींचे पालन करण्यावर भर देत आहे. वाहन विमा व्यवसायिकांकडून आलेल्या प्रतिक्रीयेनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये विमा नुतनीकरण प्रक्रीयेसाठी ग्राहकांकडूनच विनंती येत आहे. या पूर्वी विमा प्रतिनिधींना विम्याची तारीख उलटून गेल्याचे ग्राहकांच्या लक्षात आणून द्यावे लागत होते. मात्र, आता परिस्थिती या उलट असल्याची माहिती विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

 

विमा कंपन्यांचे 'सर्व्हर डाऊन'

वाहन विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन विमा व्यवसाय क्षेत्रातील व्यवहार गेल्या काही दिवसांत चार ते पाच पटींनी वाढले आहेत. या महिन्यापासूनच हा बदल दिसत आहे. यापूर्वी ग्राहकांना विमा पॉलीसी नुतनीकरणासाठी संपर्क करावा लागत होता. मात्र, दंडाची रक्कम ऐकून ग्राहकच आता विम्याची मागणी करत आहेत. गेल्या काही दिवसांत ही मागणी इतकी वाढली आहे, कि ग्राहकांना सेवा देणे कठीण झाले असून काही कंपन्यांचे सर्व्हर डाऊन झाल्याचेही प्रकार घडत आहेत. विमा प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज दहा ते बारा जणांची विमा पॉलीसीची विचारणा केली जात आहे. नव्या नियमावलीमुळे हा व्यवसाय़ वाढेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

 

विमा पॉलीसीविना वाहन चालवणाऱ्यांच्या दंडात चौपट वाढ

१ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या नव्या वाहतूक नियमावलीमुळे दंड वसुलीतील रक्कमेचे प्रमाणही वाढले आहे. विना पॉलीसी वाहन चालवणाऱ्यांकडून यापूर्वीचा १ हजार रुपयांचा दंड २ हजार करण्यात आला आहे. दुसऱ्यांदा तसे घडल्यास हा दंड चार हजार इतका केला जाणार आहे.

 

वाहन विम्याबद्दल नागरिकांबद्दल जागरुकता

एका अनुमानानुसार, देशात एकूण १९ कोटी नोंदणीकृत वाहने आहेत. त्यापैकी ८.२६ कोटी वाहनांचा विमा उतरवण्यात आला आहे. वाहनखरेदीनंतर काही वर्षानंतर विमा पॉलीसीची रक्कम उलटून गेल्यानंतर बहुतांश ग्राहक नुतनीकरणासाठी हलगर्जीपणा करत असल्याचे आढळून आले आहे. आता मात्र, हे चित्र उलटत असल्याचे मत वाहन विमा प्रतिनिधींनी व्यक्त केले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@