'विक्रम'शी संपर्क नाही, आता लक्ष्य 'गगनयान' मोहीम : के.सिवन

    21-Sep-2019
Total Views | 63


 


बेंगळुरू : चांद्रयान २ मोहिमेचा ऑर्बिटर व्यवस्थितपणे काम करत आहे. ऑर्बिटरवर लावण्यात आलेले ८ ही उपकरणे व्यवस्थितपणे काम करत आहेत. मात्र, विक्रम लँडरशी अद्यापही संपर्क साधू शकलो नाही. आता आमचे पुढील लक्ष्य गगनयान असणार आहे." अशी माहिती 'इस्रो'चे प्रमुख के. सिवन यांनी दिली.

 

चंद्रापासून अवघ्या २ किमी दुर असताना विक्रम लँडरचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यामुळे चांद्रयान मोहिमेत अडथळा आला. त्यानंतर १४ दिवसात लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे 'इस्रो'ने सांगितले होते. मात्र, लँडरशी संपर्क साधण्यात अपयश आले. दरम्यान, नासाही विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती.

 

'इस्रो'ने सोडलेल्या 'विक्रम' लँडरचे आयुष्य चंद्रावरील कालगणनेनुसार एका दिवसाचे (पृथ्वीवरील कालगणेनुसार १४ दिवसांचे) होते. ७ सप्टेंबर रोजी चांद्रभूमीवर आदळलेल्या 'विक्रम'चा जीवनकाळ शनिवारी, म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी पूर्ण झाला. त्यामुळे 'विक्रम'शी संपर्क साधण्याच्या सर्व आशा आता मावळल्या आहेत, असे सिवन यांनी स्पष्ट केले. तर आता आमचे प्राधान्य आता 'गगनयान'ला असेल, असेही ते म्हणाले.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121