हिंदी अशी भाषा जी भारताला एकजूट ठेवू शकते : गृहमंत्री अमित शाह

    14-Sep-2019
Total Views | 28





नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी हिंदी भाषेत देशात ऐक्य निर्माण करण्याची क्षमता असण्यावर भर दिला. ते म्हणाले की ,"जगात भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक भाषा असणे आवश्यक आहे. बहुतेक प्रदेशात हिंदी भाषिक असल्याने हिंदी ही अशी भाषा आहे जी भारताला एकजूट ठेवू शकते." भारताचे प्रतिनिधित्व करणारी एक भाषा असणे आवश्यक आहे असे सांगून हिंदीला प्रार्थमिक भाषा बनवावे असे आवाहनही अमित शहा यांनी केले.


"
भारत हा वैविध्यपूर्ण भाषांचा देश आहे आणि प्रत्येक भाषेला स्वतःचे महत्त्व आहे परंतु जगात भारताची ओळख निर्माण होईल अशी भाषा असणे ही फार महत्वाचे आहे. जर आज एक भाषा देशाला एकत्र करू शकत असेल आणि व्यापकपणे बोलली जाते ती हिंदी भाषा. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची स्वप्ने साकार करण्यासाठी हिंदी भाषेचा वापर वाढावा, असे आवाहनही गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये केले. तसेच सर्व हिंदी भाषिकांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121