नवी दिल्ली : पहिली दक्षिण आशियायी सीमापार तेल पाईपलाईन भारत-नेपाळ दरम्यान सुरू करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाईपलाईनचे संयुक्तपणे उद्घाटन केले.
बिहारमधील मोतिहारी ते नेपाळमधील अमलेखगंजपर्यंत पाईपलाईनने पेट्रोलियम पदार्थ जसे डिझेल, एलपीजी आणि विमान वाहतूक टर्बाईन इंधन हस्तांतरित केले जाईल. "या प्रकल्पाच्या एकत्रित उद्घाटनासाठी आज व्हिडिओ लिंकवर आपल्यासह सामील झाल्याने मला आनंद झाला." अशी प्रतिक्रिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
Watch LIVE: PM @narendramodi and Nepal PM jointly inaugurate petroleum pipeline between Amlekhgunj and Motihari. https://t.co/myV0FEJvxU
— BJP (@BJP4India) September 10, 2019