बाहुबली फेम प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'साहो' या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याची घोषणा आज करण्यात आली. पूर्वनियोजित तारखेनुसार १५ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र आता चित्रपटातील काही महत्वाच्या ऍक्शन सिक्वेन्सवर काम सुरु असल्यामुळे चित्रपट ३० ऑगस्टला प्रदर्शित करणार असल्याचे चित्रपटकर्त्यांनी प्रसारित केलेल्या माहितीपत्रकात नमूद केले आहे.
प्रेक्षकांसाठी एक चांगली कलाकृती घेऊन येण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि चित्रपट प्रभावशाली बनवण्यासाठी तेवढा वेळ आणि कष्ट त्यासाठी द्यावे लागतात. त्यामुळेच चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र देशभक्ती आणि स्वातंत्र्याचे दर्शन ज्या महिन्यात देशवासियांना घडले त्याच महिन्यात चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपटकर्त्यांनी घेतल्यामुळे ३० ऑगस्टला 'साहो' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूडमध्ये दरवर्षी साधारण २५० ते ३०० चित्रपटांची निर्मिती होते. एवढ्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर अव्वल कोण येणार यासाठीची चढाओढ कायमच सुरु असते. अशातच १५ ऑगस्टला मिशन मंगल, बाटला हाऊस आणि साहो असे ३ चित्रपट प्रदर्शित होणार होते मात्र आता या शर्यतीतून 'साहो' चित्रपट बाहेर पडला आहे.
No compromise on the content and quality!
— UV Creations (@UV_Creations) July 19, 2019
The action begins in cinemas from 30th Aug. #Saaho releasing worldwide on 30.08.2019.#Prabhas @ShraddhaKapoor @NeilNMukesh @arunvijayno1 @sujeethsign @UV_Creations @itsBhushanKumar @TSeries #30thAugWithSaaho pic.twitter.com/Clne9tuiVS
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat