मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणात केंद्र सरकारला मोठे यश

    25-Jun-2019
Total Views | 45


नवी दिल्ली : देशातील कोट्यवधींचा गैरव्यवहार करून एंटीगुआ येथे राहत असलेला हिरेव्यापारी मेहुल चोक्सी याच्या प्रत्यार्पणात भारताला मोठे यश मिळाले आहे. एंटीगुआ येथील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहीतीनुसार, तेथील पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी चोक्सीचे नागरीकत्व रद्द करण्याला संमती दर्शवली आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

गॅस्टन ब्राउन यांच्या म्हणण्यानुसार, एंटीगुआ हे जगभरातील लोकांसाठी सुरक्षित असे ठिकाण आहे, असे वाटत असेल तर, तो मोठा गैरसमज आहे. मेहूल चोक्सीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आम्ही तूर्त आरोपीला दिलासा देत आहे. भारत सरकारशी संपर्क करत आरोपीलाही त्याचा बचाव करण्याचा अधिकार असल्याचे सांगत, ही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर त्याचे प्रत्यार्पण करण्यात येईल, असे ते म्हणाले.

 

पीएनबी गैरव्यवहारात आरोपी असलेल्या मेहूल चोक्सी याने उच्च न्यायालयात आपला जबाब नोंदवताना म्हटले होते कि, तो पीएनबी घोटाळ्यातून वाचवण्यासाठी नव्हे तर प्रकृतीच्या कारणास्तव या ठिकाणी राहत आहे. या सुनावणीवेळी १ जुलैपर्यंत चोकसीचा आरोग्य अहवाल मागवण्यात आला आहे.

 

मेहुल चोक्सीच्या तपासणीसाठी एक डॉक्टरांचे पथकही रवाना करण्यात येणार आहे. मेहुल चौक्सीला हवाई रुग्णावाहीकेद्वारे आणण्यात येण्यासंदर्भात हे पथक अहवाल तयार करेल. त्यानंतर पुढील सुनावणी १० जुलै रोजी केली जाणार आहे.

 

पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हा १३ हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी फरार आहेत. २०१८ मध्ये हा गैरव्यवहार उघडकीस येण्यापूर्वी या दोघांनी देश सोडला होता. दरम्यान दोघांनाही सक्तवसुली संचलनालय व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाद्वारे फरार घोषित केले आहे. निरव मोदी सध्या लंडन येथे राहत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराच्या जाळ्यात नुकताच ऋतुजा राजगेसारख्या गर्भवती, सुशिक्षित युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा छळ करण्यात आला. या घटनेनंतर आता तरी आरक्षणाचा लाभ घेणार्‍या समाजाला जागं होणं अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षण व्यवस्था धर्मांतरासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी होती. शतकानुशतके शोषित राहिलेल्या घटकांना सन्मानाने उभं राहता यावं म्हणून होती. मात्र, आज जिहादी आणि ख्रिस्ती मिशनरी वृत्तीने प्रेरित झालेल्या धर्मांतरितांकडून, या व्यवस्थेचा दुरुपयोग ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121