चाकरमान्यांसाठी शिवशाही धावणार : गणपतीसाठी ४०० गाड्या ताफ्यात

    09-May-2019
Total Views | 242


 


मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या फुल्ल झाल्या आहेत. चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी आता एसटी महामंडळ पुढे आले आहे. कोकणवासी आणि राज्यातील नागरिकांना दिलासा देत एसटी महामंडळ भाविकांच्या सोयीसाठी आपल्या ताफ्यात नवीन ४०० शिवशाही दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

शिवशाहीच्या सद्यस्थितीतील अडचणींवर मात्र करण्यासाठी गाड्यांच्या चेसिस व इंजिनमध्ये देखील बदल केले जाणार आहेत. गणेशोत्सवात कोकणासह राज्यभरात मोठ्या संख्येने भाविक आपापल्या गावी जातात. या काळात अनधिकृत टप्पा वाहतूक करणारे तसेच खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून प्रवाशांची सिझनल लुट सुरूच असते. हा प्रकार थांबवण्यासाठी अधिकाधिक एसटी फेऱ्या चालवण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. खासगी ट्रॅव्हल्सना टक्कर देण्यासाठी महामंडळ स्वमालकीच्या वातानुकूलित शिवशाही बांधणार आहे.

 

घाट मार्गावर एसी बंद पडणे, दोन आसनांमध्ये जागा कमी असणे, चार्जिक पॉइंट कार्यरत नसणे या आणि अन्य समस्या 'शिवशाही'मध्ये भेडसावत आहेत. या तक्रारींबाबत संबंधित कंत्राटदारांना महामंडळाने कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. तक्रारी सोडवण्यासाठी महामंडळाने ४०० 'शिवशाही'च्या चेसिसमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. इंजिनची क्षमता वाढवण्यासाठी २५० अश्वशक्तीचे इंजिन बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

रेल्वे तिकीट आरक्षणाच्या ऑडीटची मागणी

गणेशोत्सव आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी तिकीट प्रतीक्षा यादी पाचशेच्या वर गेल्याने प्रवासी हवालदिल झाले होते. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने नुकतीच चेंबूरस्थित अनधिकृत तिकिट दलालांवर कारवाई करीत २० लाखांची तिकिटे जप्त केली आहेत. पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाने अडीच लाखांची तिकिटे जप्त केली. यामुळे गणेशोत्सव काळातील आरक्षण तिकिटांचे बुकिंग खरच झाले की एजंटने येथेही हातचलाखी केली, अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या गैरप्रकाराचे ऑडीट करायला हवे, अशी मागणी आता प्रवाशांनी केली आहे.

 

शिवशाहीचे रुपडे पालटणार

नव्याने बांधणी होणाऱ्या शिवशाही बसमध्ये दोन आसनांमधील मोकळी जागा वाढवण्यात येणार आहे. नवीन चेसिस बदल व डिझाइन बदलासाठी पुण्यातील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. येत्या १० दिवसांत मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बसबांधणीला सुरुवात होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121