राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन पुन्हा एकदा 'बंटी और बबली' च्या आठवणी ताज्या करणार आहेत. 'बंटी और बबली' या चित्रपटातील त्यांच्या केमीस्ट्रीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ती जादू 'बंटी और बबली अगेन' मधून मोठ्या पडद्यावर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
राणी मुखर्जी सध्या मर्दानी २ या तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरांमध्ये व्यस्त असतानाच तिने बंटी और बबली च्या सिक्वलमध्ये काम करण्यास होकार दिला आहे. त्याचबरोबर अभिषेक बच्चन देखील सध्या अनुराग बसू दिग्दर्शित आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. बरेच दिवस चित्रपटांपासून लांब असलेल्या अभिषेक बच्चनला पुन्हा एकदा चित्रपटाकडे वळताना पाहून त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढणार आहे.
राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्यासह चित्रपटातील अन्य स्टारकास्ट देखील आधीच्या चित्रपटाचीच असल्याचे सांगण्यात येत आहे. जून महिन्यापासून मुंबईत या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. शाद अली दिग्दर्शित 'बंटी और बबली अगेन' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुढील महिन्यापासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat