नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळू शकेल, असा अंदाज देशभरातील अनेक एक्झिट पोलच्या आकडेवारीतून व्यक्त केला जात आहे. यानुसार देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा अंदाज बहुतेक सर्व संस्था-वृत्तवाहिन्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे यंदा काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या जागाही वाढण्याचा अंदाज आहे. कॉंग्रेसप्रणित आघाडीला केवळ १२५ ते १३० जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ममता दिदींचा गड असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारणार असल्याचाही अंदाज आहे.
एक्झिट पोल : (भाजप+), (काँग्रेस+), (इतर)
▪ टीव्ही ९-सी व्होटर : (२८७), (१२८), (१२७)
▪ टाईम्स नाऊ-VMR : (३०६), (१३२), (१०४)
▪ एबीपी-नेल्सन : (२६७), (१२७), (१४८)
▪ न्यूज २४ - टुडेज चाणक्य : (३४०), (७०), (१३३)
▪ न्यूज नेशन : (२८२-२९०), (१११-१२६), (१३०-१३८)
▪ न्यूज १८- IPSOS : (३३६), (८२), (१२४)
▪ इंडिया न्यूज-पोल स्ट्रॅट : (२८७), (१२८), (१२७)
▪ न्यूज एक्स : (२४२), (१६४), (१३६)
▪ रिपब्लिक-जन की बात : (३०५), (१२४), (८७)
महाराष्ट्रात कुणी किती जागा दिल्या?
एक्झिट पोल : (भाजप+), (काँग्रेस+), (इतर)
▪ टीव्ही ९-सी व्होटर : (३४), (१४), (००)
▪ टाईम्स नाऊ -VMR : (३८), (१०), (००)
▪ एबीपी-नेल्सन : (३४), (१३), (०१)
▪ न्यूज २४ - टुडेज चाणक्य : (३८), (१०), (००)
▪ न्यूज नेशन : (३३-३५), (१३-१५), (००)
▪ न्यूज १८- IPSOS : (४१-४५), (३-६), (०१)
▪ इंडिया न्यूज -पोल स्ट्रॅट : (३४), (१४), (००)
▪ न्यूज एक्स : (३६), (११), (०१)
▪ रिपब्लिक-जन की बात : (३४-३९), (८-१२), (०१)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat