नवी दिल्ली : पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक आणि अभिनंदन प्रकरणावरून देशातील विरोधकांनी मोठा राजकीय कट रचला होता, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी हा आरोप केला. मात्र अभिनंदनच्या सुटकेची घोषणा झाल्यानंतर विरोधकांचा हा प्रयत्न फासल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.
विरोधकांवर घणाघात करताना मोदी म्हणाले, "जे आपल्या देशाच्या पंतप्रधानावर संशय घेतात आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानाचे कौतुक करतात, अशांना आपण ओळखले पाहिजे. अभिनंदन प्रकरणावेळी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडणाऱ्या जवानाचा आम्हाला अभिमान आहे, असे एकजुटीने सांगण्याची गरज होती. मात्र विरोधकांनी येथेही राजकारण करायची संघी सोडली नाही."
विरोधकांच्या कटाविषयी सांगताना मोदी म्हणाले, "त्या रात्री कैंडल लाइट मार्च आणि पुलवामा हल्ल्याला राजकीय मुद्दा बवण्याची योजना आखली होती. मात्र त्याच दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली. त्यामुळे विरोधकांचा हा मोठा कट फसला." माझ्यासाठी देश किती महत्वाचा आहे, हे संपूर्ण देश जाणतो त्यामुळे देशातील कुठलीही व्यक्ती माझ्या देशभक्तीवर शंका घेत नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat