मुंबई : 'स्लमडॉग मिलेनियर' या सिनेमाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यानचा एक फोटो शेअर केल्यानंतर ए. आर. रहमानला नेटकऱ्यांनी धारेवर धरले.
The precious ladies of my family Khatija ,Raheema and Sairaa with NitaAmbaniji #freedomtochoose pic.twitter.com/H2DZePYOtA
— A.R.Rahman (@arrahman) February 6, 2019
त्याने शेअर केलेला फोटो आणि कॅप्शन यातील विरोधास पाहत अनेकांनी त्याला खडेबोल सुनावले. या फोटोमध्ये रहमानची पत्नी आणि मुलगी आहे. निता अंबानीसोबत त्याने आपल्या मुलींचा आणि पत्नीचा फोटो शेअर केला. माझ्या कुटुंबातील मौल्यवान महिला खातिजा, रहिमा आणि सायरा, निता अंबानींसोबत #Freedomtochoose, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले.
Sad, sir!
— Dharmic Fundoo🚩🌺 (@DharmicFundoo) February 7, 2019
Wasting a precious life behind curtains, not experiencing the breeze, the sunlight, God's creation on one's skin.#PrisonerForLifehttps://t.co/Py2tJCtyUr
मात्र, फोटोत रहमानची मुलगी बुरख्यात दिसत आहे. या कारणामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. चेहराच दाखवायचा नव्हता तर फोटो काढला कशाला?, असे म्हणत बुरख्यात कसले स्वातंत्र्य, असा सवाल त्याला विचारला. असे अनेक प्रश्न उपस्थित करत नेटकऱ्यांनी रहमानला ट्रोल केले आहे.
Freedom to choose😝😝😝
— Villi (@vimalvishwk) February 7, 2019
Freedom of wear😝😝😝#freedomtochoose
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/