बीडमधील भोंगळ कारभार : मृतांच्या यादीत जीवित व्यक्तींची नावे

निष्काळजीपणा की पैशांसाठी केलेला घोटाळा?

    25-Dec-2021
Total Views | 126

 
Corona _1

 
 
बीड - कोरोना संक्रमणाची तिसरी लाट घोंगावत असतानाच महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेला भोंगळ कारभार समोर आला आहे. कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांना राज्य सरकारकडून ५०,००० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. अशातच कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांच्या यादीतून दोन जीवित व्यक्तींची नावे समोर आली आहेत. या कृत्यास निष्काळजीपणा म्हणावा की घोटाळा. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 
मृतांच्या यादीत सामान्य व्यक्तीबरोबरच एका सामाजिक कार्यकर्त्याचे देखील यात नाव असल्याचे अंबेजोगाई नगर परिषदेचे तहसिलदार विपिन पाटील यांनी सांगितले. हे दोघेही जिवंत असून त्यांची नावे यादीत कशी आली; यासंदर्भात चौकशी सुरू आहे. जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे महसूल विभागाने मृतांची यादी तयार केल्याचे तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
 
जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या मृत व्यक्तींच्या यादीत एकूण ५३२ जणांची नावे आहेत. कोरोना बाधितांची यादी बनवण्याचे काम सुरू असून उर्वरित यादी पडताळणीसाठी नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीकडे पाठवण्यात आली आहे. त्यातील चूका सुधारल्यानंतर अंतिम यादी तयार होईल असे विपिन पाटील यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121