नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध कायद्याच्या विरोधात दिल्लीत पुन्हा हिंसाचार उसळला आहे. दिल्लीतील सीलमपूर भागातील आंदोलकांनी पोलीसांवर दगडफेक केली तसेच तीन बस फोडून नुकसानही केले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीसांनी पूर्णपणे प्रयत्न केले आहेत. मात्र, आंदोलकांनी दगडफेक करत पोलीसांवर दगडफेक केली. या घटनेत काहीजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाफराबाद येथे मोर्चा पोहोचल्यानंतर हिंसाचार उसळला आहे.
दरम्यान, सीलमपूर भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर दिल्लीतील पाच मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. वेलकम, जाफराबाद, मौजपूर-बाबरपूर, सीलमपूर आणि गोकलपूर ही मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहेत. सीलमपूरहून सुरू झालेल्या मोर्चात जाफराबादमध्ये हिंसाचार उसळला. दोन दिवसांपूर्वी नागरिकत्व सुधारणा दुरुस्ती विधेयकाविरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात रविवारी हिंसाचार उसळला. पोलीसांनी आज दहाजणांना या प्रकरणात अटक केली. या आरोपींमध्ये एकहीजण विद्यार्थी नसून यातील तीन जण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे उघड झाले.
दरम्यान, याविरोधात ईशान्य भारतात उसळलेला हिंसाचार काहीसा थंडावला आहे. आसाम सरकारने संचारबंदी उठवली असून या प्रकरणात आत्तापर्यंत १३६ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. १९० आंदोलकांना अटक करण्यात आली होती. या आंदोलकांना हिंसाचाराच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. तसेच हे विविध संघटनांचे प्रमुख असल्याचीही माहिती उघड झाली आहे, अशी माहिती आसाम पोलीसांनी दिली.
हिंसाचाराच्या याचिकांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले
— महा MTB (@TheMahaMTB) December 17, 2019
हिंसाचारावरील घटनांची सुनावणी तातडीने होणार नाही : न्यायालय#HinduphobicJamia#TuesdayThoughts #CAAProtest #ISupportCAA #UnityIsOurReligionhttps://t.co/9sEkUrLZdg