इफ्फीमधील मल्टीमिडिया प्रदर्शनाचे उद्‌घाटन संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |


इफ्फीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात १९५२ पासून आतापर्यंतचा इफ्फीचा प्रवास उलगडून दाखवणाऱ्या इफ्फी@५० या हाय-टेक प्रदर्शनाचे आज गोव्यात उद्‌घाटन झाले आहे. गोव्यातल्या कला अकादमीजवळ दर्या संगम इथे माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि फिल्ममेकर सुभाष घाई आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थित प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. २१ ते २८ नोव्हेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.

भारतीय चित्रपट जगासमोर आणण्यासाठी इफ्फीचा मंच कसा उपयुक्त ठरला त्याचबरोबर जगभरातले चित्रपट दाखविण्यासाठी इफ्फी हा भारताचा मंच कसा ठरला हे दर्शवण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

विविध इनस्टॉलेशनद्वारे सिनेरसिकांना भारतीय चित्रपटांत घडलेली क्रांती अनुभवता येईल. याशिवाय व्हर्टीकल डिजिटल डिसप्ले पॅनेल्स, व्हर्च्युअल रिॲलिटी टुल्स, होलोग्राम टेक्नॉलॉजी, अशी उच्च तंत्रज्ञानावर आधारित वैशिष्ट्ये प्रथमच या प्रदर्शनात पाहता येतील. चित्रपट निर्मिती कौशल्य आणि चित्रपटांचा समाजावरचा प्रभावही प्रेक्षकांना पाहता येईल.

चित्रपट प्रश्न मंजूषा, स्वच्छ भारत, एकदाच वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळणे, एक भारत श्रेष्ठ भारत यासारख्या सरकारी उपक्रमांवर लघुपट निर्मिती, चित्रकला, यासारख्या स्पर्धाया प्रदर्शना दरम्यान मुलांसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत.

@@AUTHORINFO_V1@@