वय वाढते तशी बुद्धी परिपक्व होते! यांचं काय?

    15-Nov-2019
Total Views | 178


 

मुंबई : गेले काही दिवस दररोज सकाळी उठून सकाळ-सायंकाळ पत्रकार परिषद घेणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी वाढदिवसाच्या 'मार्मिक' शब्दांत शुभेच्छा दिल्या. संजय राऊत यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देताना राऊत यांनी वय वाढल्यावर परिपक्वता यायला हवी, असा टोला लगावला.

 

राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा आशिष शेलार यांनी आज समाचार घेतला. "शिवसेनेचे मोदी प्रेम हे स्वार्थी आहे कि निस्वार्थी ते आधी सांगावे" हे स्पष्ट करावे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना समजण्यासाठी राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील, असेही शेलार म्हणाले. "राज्यातील ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भाजपचे सर्व आमदार प्रयत्न करणार आहेत," असेही शुक्रवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत ठरल्याचेही ते म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121