बॉलिवूडचा बादशहा, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान डेव्हिड लेटरमन्स शोमध्ये झळकणार हे ऐकल्यावर सगळया चाहत्यांच्या उत्साहाला पारावारच उरला नव्हता. आज त्याच शोच्या शूटिंगदरम्यानची एक छोटीशी झलक प्रदर्शित करण्यात आली आहे. ही झलक पाहिल्यावर प्रेक्षक पुन्हा एकदा शाहरुख खानच्या प्रेमात तर पडतीलच पण त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीचा अभिमान सुद्धा वाटेल.
आज प्रदर्शित झालेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि डेव्हिड लेटरमन मजा मस्ती करताना दिसत आहेत. तर त्यांचा एकमेकांना भेटण्याचा अनुभव आणि एकमेकांच्या सिनेसृष्टीतील कामगिरीविषयी काय वाटते याची छोटीशी झलक या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शाहरुख खानाने आपल्या आयुष्यात खूप संघर्ष करून चित्रपट जगतात आपले एक स्थान निर्माण केले आहे. आणि तेच डेव्हिड लेटरमन यांनी देखील त्यांच्या सिनेसृष्टीत निर्माण केले आहे. त्यामुळे या दोन्ही कलाकारांच्या गप्पा ऐकण्यास सर्वच जण उत्सुकता आहेत. नेटफ्लिक्सवरील ही संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा २५ ऑक्टोबरपर्यंत करावी लागेल.
The most fun I’ve had being interviewed. Thank u so much @Letterman for being so gracious and all happiness. U r a gentleman sir ! Also @netflix & @NetflixIndia for having me over at NY. https://t.co/3OK6B3plm3
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 9, 2019