दिवा हा प्रकाश देतो. आपल्या धर्मात प्रकाश हा सकारात्मकतेचं , शुद्धतेचं प्रतीक आहे. तर अंधार हा वाईट, दुष्ट शक्तीचं प्रतीक आहे. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचं रूप असून ती अंधाराचा नाश करून सर्वत्र सकारात्मकता आणि शांती प्रदान करते. या दिव्याचा उजेड यशाकडे, उन्नतीकडे नेतो. म्हणूनच प्रत्येक पूजेत तेलाच्या दिव्याला स्थान असतंच.
फक्तदिवाळीतच नव्हे , तर दररोजच सकाळी आणि तिन्हीसांजेला घरातल्या देव्हाऱ्यात , तुळशीपाशी तेलाचा दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचं कवच तयार होतं . या सात्त्विक लहरींच्या कवचामुळे घरातील व्यक्तींचं वातावरणातल्या अनिष्ट, दुष्ट शक्तींच्या स्पंदनांपासून रक्षण होत. दिव्याकरिता पूर्वीपासून तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. या तेलाच्या ज्योतीकडे उच्चंदेवतांची स्पंदनं आकृष्ट होतात आणि त्यातून प्रक्षेपित लहरींमध्ये तेज तत्त्वाचं प्रमाण अधिक असत असं शास्त्र सांगतं .
तीळ तेलाचं हे महत्त्व लक्षात घेऊन पितांबरीनं दीपशक्ती तेलाची निर्मिती केली आहे. खास दिव्याकरिता तीळ तेल उपलब्ध केल्यामुळे त्याची किंमतही सर्वांना परवडेल अशी झाली आहे. दीपशक्ती तेलाच्या दिव्यामुळे धूर कमी होतो आणि ज्योत दीर्घकाळ शांतपणे तेवत राहते. तसेच दीपशक्ती तेल आल्हाददायक सुगंधाने युक्त आहे. दीपशक्ती तेलाने वातावरणात सात्त्विकता वाढते. आणि मनाला शांती मिळते. आध्यात्मिक भावजागृती होऊन एकाग्रता वाढते व कृतज्ञता व्यक्त होते, जी ईश्वरराधनेसाठी पूरक ठरते. या वर्षी आपल्या घरासमोर पितांबरी दीपशक्ती तेलाच्या पणत्या लावून घराची शोभा वाढवू या !