हरियाणात भाजपकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Oct-2019
Total Views |
 


नवी दिल्ली : हरियाणामध्ये भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली आहे. त्यापूर्वी अपक्ष विजयी उमेदवार सोमवीर सांगवान यांनी भाजपला समर्थन देत सत्ता स्थापनेसाठी मदत करणार असल्याचे म्हटले आहे.

 

हरियाणा विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी भाजपच पुन्हा पहिल्या क्रमांकाच पक्ष ठरल्याचे चित्र आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत काहीसे अच्छे दिनआल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीतील एकूण ९० जागांपैकी भाजप एकूण ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस या निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष ठरला असून काँग्रेसचे उमेदवार २९ जागांवर पुढे आहेत.

 

जेजेपी हा पक्ष तिसर्‍या क्रमांकावर उभा असून ११ जागांवर आघाडीवर आहे. हरियाणात ४६ हा बहुमताचा आकडा असून भाजप अवघ्या ३ ते ४जागा दूर आहे. मतदारांनी याठिकाणी कोणाही एका पक्षाला येथे एकहाती सत्ता न दिल्याने येथे सत्ता स्थापनेसाठी मोठी चुरस असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपसोबत काँग्रेसनेही येथे घटक पक्षांसोबत बोलणी सुरु करत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. यात दुष्यंत चौटाला यांचा जेजेपी पक्ष मोठी भूमिका बजावणार असल्याचे चित्र आहे.

@@AUTHORINFO_V1@@