धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल

    20-Oct-2019
Total Views | 140





मुंबई : धनंजय मुंडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल आता महिला आयोगाकडूनही दखल घेण्यात आली आहे. धनंजय मुंडेंविरोधात सुमोटो दाखल करून घेण्यात आला असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली आहे. दरम्यान धनंजय मुंडेंविरोधात परळी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. 

 

केज तालुक्यातील विड्याच्या भरसभेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपानंतर परळीत भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकाला घेराव घातला होता. "राज्य महिला आयोग धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध सुमोटो दाखल करणार आहे. दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही राज्य महिला आयोगाने म्हटले आहे.




 

धनंजय मुंडे यांचे स्पष्टीकरण

 

धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली 'ती' क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासण्याची मागणीही त्यांनी केली.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121