यवतमाळ येथे ‘महा मतदार जागृती’ रथाला जिल्हाधिका-यांनी दाखवला झेंडा

    02-Oct-2019
Total Views |


आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी व मतदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासन व अमरावती येथील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात महा मतदार जागृतीरथ फिरविण्यात येणार आहे. या रथाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक नुरूल हसन, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, केंद्रीय प्रसिध्दी अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, सहाय्यक प्रसिध्दी अधिकारी अंबादास यादव, श्रीकांत जांभुळकर आदी उपस्थित होते.

जेथे मतदानाची टक्केवारी कमी आहे तेथे मतदारांना प्रेरीत करून मतदानामध्ये मोठ्या संख्येने भाग घेण्याकरीता १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान सदर चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबत सात जणांचे कलापथक असून ऑडीओ-व्हीडीओच्या माध्यमातूनसुध्दा नागरिकांमध्ये मतदानाबाबत आवाहन करण्यात येणार आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121