...म्हणून मी कर्णधारपद सोडले: धोनी

    14-Sep-2018
Total Views | 36



 


झारखंड: क्रिकेटविश्वात जर भारताला कोणी वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं असेल तर तो भारताचा 'माजी' कर्णधार महेंद्रसिंग धोनी. भारताला दुसऱ्यांदा क्रिकेटचा विश्वचषक मिळवून देणारा क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीने कर्णधारपद का सोडलं असा प्रश्न इतके वर्ष सगळ्यांनाच पडला होता. बरेच दिवसांनी त्याच्या चाहत्यांना त्याचे उत्तर मिळाले आहे. खुद्द धोनीने यावर मौन सोडले आहे. विराट कोहलीला २०१९ विश्वचषकासाठी तयार करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा नुकताच त्याने रांचीत एका कार्यक्रमात केला.

 

रांची विमानतळावर तरुणांसाठी एका प्रेरणादायी कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात धोनीला कर्णधारपद का सोडले असा एका चाहत्याने प्रश्न विचारला. तेव्हा धोनी म्हणाला की, २०१९ रोजी होणाऱ्या विश्वचषकासाठी मला विराटला तयार करायचं होते. एक उत्तम संघ आणि त्याचं नेतृत्व करणारा योग्य कर्णधार एका रात्रीत तयार होत नाही. त्यासाठी कर्णधाराची योग्य जडणघडण व्हावी लागते. विराट त्यासाठी तयार व्हावा माझी इच्छा होती, तसंच आपण कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य वयात,योग्य वेळी घेतल्याचेही धोनीने सांगितले.

 

धोनीने कर्णधार पद भूषवताना अनेक विक्रम रचले आहेत. २००७चा आईसीसीचा टी-२० विश्वकप, २०११ मध्ये आईसीसीचा विश्वकप आणि २०१३ मध्ये आईसीसीची चॅम्पियन ट्रॉफी हे सुद्धा त्याने स्वतःच्या व भारताच्या खात्यात जमा केली होती. आईसीसीचे हे तिन्हीही कप जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. याशिवायही त्याने क्रिकेटच्या तीनही स्वरूपात वेगवेगळे पायंडे रचले आहेत. २०१४मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून सन्यास घेतला आणि २०१७मध्ये त्याने एकदिवसीय, टी-२० सामान्यांचे कर्णधारपद सोडले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121