
जिल्हाधिकार्यांकडून भुसावळ गोदामाची पाहणी
भुसावळ, ७ जून
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी रावेर लोकसभा मतदार संघातील भुसावळ येथिल शासकिय गोदामाची पाहणी गुरुवारी केली.त्यांच्या सोबत निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, भुसावळचे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, तहसिलदार संजय तायडे, निवडणुक तहसिलदा सुरेश थोरात आदी उपस्थित होते.
सन २०१९ मध्ये होणार्या लोकसभेच्या निवडणूकांसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्ॉनिक मतदान यंत्र ठेवण्यासाठी सर्वसोयींनी युक्त अशा जागेची निवड करण्याचे निर्देश निवडणुक आयोगाने दिले आहे. त्यानुसार शासकिय गोदामांची ही पाहणी करण्यात आली.
यानिवडणुकिसाठी वापरण्यात येणारे यंत्र हे बैंगलोर येथून उपलब्ध होणार आहे.ही यंत्रे प्रशासनाने चाळीसगाव व भुसावळ येथे ठेवण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. त्यासाठीच शासकिय गोदामांची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकार्यांनी गोदामात इलेक्ट्ॉनिक मतदान यंत्र सुस्थितीत रहावे म्हणून गोदामात लाईट, पंखे, सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणेसह सुविधा उपलब्ध करण्याच्या सुचना यंत्रणेला दिल्या आहेत.
जळगाव लोकसभा मतदार संघासाठीचे इव्हीएम चाळीसगाव येथे तर रावेर लोकसभा मतदार संघासाठीचे इव्हीएम भुसावळ येथील शासकिय गोदामात ठेवले जातील.जिल्ह्यात ३ हजार ३६० मतदान केंद्रे असून त्यासाठी ७ हजार ४८८ बॅलेट युनिट , ४ हजार ३५४ कंट्ोल युनिट तर ४ हजार ३५४ व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध होणार आहेत.