स्वप्नांच्या देशातली ‘इमिग्रेशन’ वाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018   
Total Views |




अमेरिकेत कायमचे स्थायिक व्हावयाचे असेल आणि काम करावयाचे असेल, तर त्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते. वॉशिंग्टनमधील कॅटो संस्थेने ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्यांच्या संख्येवरून काही निष्कर्ष काढले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये किती ग्रीन कार्ड देण्यात आली त्यावर हे निष्कर्ष बेतलेले आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याएच- बीव्हिसाविषयक धोरणांमुळे आताअमेरिकेत काम करणारे भारतीय तंत्रज्ञ आणि त्यांचे भवितव्यया संदर्भात अनेक उलटसुलट बातम्या येत आहेत. ‘अमेरिका म्हणजे जिथे तुम्ही स्वकर्तृत्वावर यशाच्या पायर्‍या चढत जाता, इतर कुठलीही बंधनं पाळता.’ त्यामुळेच इथल्या व्हिसा नियमांतील बदलांची चर्चा आणि त्या चर्चेची व्याप्ती सर्वत्र पसरते.

अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळण्याची आशा असलेल्यांना त्यासाठी कदाचित १५० वर्षे प्रतीक्षा करावी लागू शकते, असा अहवाल एका संस्थेने दिला आहे. अमेरिकेत कायमचे स्थायिक व्हावयाचे असेल आणि काम करावयाचे असेल, तर त्यासाठी ग्रीन कार्ड आवश्यक असते. वॉशिंग्टनमधील कॅटो संस्थेने ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्यांच्या संख्येवरून काही निष्कर्ष काढले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ मध्ये किती ग्रीन कार्ड देण्यात आली त्यावर हे निष्कर्ष बेतलेले आहेत.

एप्रिल २०१८ पर्यंत अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या आणि ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्या भारतीयांची संख्या सहा लाख ३२ हजार २१९ इतकी आहे. त्यामध्ये प्रमुख व्यक्ती, त्याची पत्नी, आई-वडील आणि मुले यांचा समावेश आहे. आता कोणाला आणि कधी ग्रीन कार्ड द्यावयाचे त्याचेही निकष आहेत. जो अत्यंत कुशल आहे, उच्चशिक्षित आहे त्याला सहा वर्षांची प्रतीक्षा करावी लागते, असामान्य प्रकारामध्ये ३४ हजार ८२४ जण असून, त्यांच्यासह ४८ हजार ७५४ जोडीदार आणि मुलांचा समावेश आहे.

आणखी एक प्रकार म्हणजे पदवीधर, त्यांना ग्रीन कार्डसाठी १७ वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. कारण ते तुलनेत कमी कुशल आहेत, अशा भारतीयांची संख्या ५४ हजार ८९२ आणि त्यांच्यासोबत ६० हजार ३८१ कुटुंबीयही याच प्रकारात आहेत. त्यानंतर कामगार हा प्रकार असून, सध्या त्यांना ज्या वेगाने व्हिसा दिला जातो त्याचा विचार केल्यास ग्रीन कार्ड मिळण्यासाठी या प्रकारातील भारतीयांना १५१ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हणजेच त्यांना कधीच ग्रीन कार्ड मिळणार नाही, असा निष्कर्ष कॅटो संस्थेने काढला आहे. प्रत्येक प्रकारामध्ये किती जणांना ग्रीन कार्ड द्यावयाचे यावरही बंधन आहे, त्यामुळे ही यादी लांब होत जाते आणि प्रतीक्षायादीचा कालावधीही वाढत जातो. त्यामुळे लाखो भारतीयांना त्यांच्या हयातीमध्ये अमेरिकेचे कायमचे नागरिकत्व देणारे ग्रीन कार्ड मिळणे सध्याच्या नियमांनुसार तरी शक्य नाही, ही गोष्ट यामधून स्पष्ट होत आहे.

व्हिसा हा विषय अमेरिकेतीलस्टेट डिपार्टमेंटकडे असतो. म्हणजे आपल्याकडील परराष्ट्र मंत्रालय! हा विभाग अमेरिकेच्या सर्व परदेशी वकिलातींवर नियंत्रण ठेवतो. तसंच, सर्व ग्रीन कार्ड व्हिसांची संख्या हाच विभाग मंजूर करतो. ‘कोणत्या देशातील किती लोकांना व्हिसा द्यावा,’ हे अमेरिकी काँग्रेस (आपल्याकडची संसद) सांगते. जोपर्यंत अमेरिकी काँग्रेस ही व्हिसांची संख्या वाढवत नाही, तोपर्यंत ग्रीन कार्डची रांग अशीच सुरू राहणार. देशनिहाय इच्छुकांच्या आकडेवारीवर एक नजर टाकू. भारत-,०६,६०१, चीन-६७,०३१, एल साल्वाडोर-,२५२, ग्वाटेमाला-,०२७, होंडुरास-,४०२, फिलिपिन्स-,४९१, मेक्सिको-७००, व्हिएतनाम-५२१. हा आकडा वाढता आहे. त्याचप्रमाणे रांगही वाढती आहे. त्यामुळे स्वप्नांच्या देशात गेलेल्या आणि ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्यांना खरंच किती काळ प्रतीक्षा करावी लागते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@