पाकिस्तान लष्कर करणार 'शरीफ' यांची तक्रार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-May-2018
Total Views |


इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी २६/११ मुंबई हल्ल्याविषयी केलेल्या वक्तव्याचा पाकिस्तान लष्कराने तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून शरीफ यांच्या या वक्तव्यासंबंधी पाकिस्तानचे वर्तमान पंतप्रधान शाहीद खाक्न अब्बासी यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी याविषयी नुकतीच माहिती जाहीर केली आहे. गफूर यांनी सांगितल्याप्रमाणे आजच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली असून यामध्ये शरीफ यांच्या वक्तव्यासंबंधी चर्चा करण्यात आली. शरीफ यांनी मुंबई हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान केले असून यामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमाला मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे याविषयी पंतप्रधान अब्बासी यांची भेट घेऊन त्याच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे गफूर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान उद्या सकाळी ही भेट घेण्यात येणार असल्याचे देखील गफूर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबैठकीत पाक लष्कर शरीफांवर कारवाईची मागणी करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


माजी पंतप्रधान शरीफ यांनी काल पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये २६/११ च्या मुंबई हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा हात असल्याचे मान्य केले होते. शरीफ यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये मात्र एकच खळबळ उडाली होती. तसेच शरीफ यांच्यावर जोरदार टीका देखील केली जात होती. शरीफ यांचे वक्तव्य हे अत्यंत बेजाबदार असून यामुळे पाकिस्तानचे प्रतिमा खराब झाल्याचीच टीका अनेक जण करत होते. परंतु शरीफ यांच्या या वक्तव्यामुळे भारताची बाजू मात्र बळकट झाली असून भारताने त्यांच्या या वक्तव्याचे स्वागत केले आहे. त्यामुळे पाकिस्तान लष्कर हे जास्त खवळे असून यानंतर तातडीने एनएससीच्या बैठक आयोजित करण्यात आली होती.
@@AUTHORINFO_V1@@