जिल्ह्याच्या विकासासाठी नव्या मार्गांचा शोध घ्या : हंसराज अहिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2018
Total Views |


गडचिरोली : 'केंद्र सरकारने सुरु केलेल्या आकांक्षित जिल्हा या नव्या योजनेसाठी काही निवडक जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पारंपारिक पद्धतीचा त्याग करून आता नव्या मार्गांचा शोध घ्या,' असे आवाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. 
देशातील निवडक जिल्हयात गडचिरोली जिल्हा सर्वांगीण विकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडला आहे. या निवडक जिल्ह्यांचा विकास योग्य पद्धतीने होत आहे का ? यावर पंतप्रधान स्वतः लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याहे अपेक्षित विकासाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी सर्वांनी गतिमान प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे, असे ते म्हणाले. याचबरोबर गडचिरोलीमधील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यांचा आणि गावांच्या विकासाकडे सर्वांनी अधिक लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. यासाठी काही कल्पना देखील त्यांनी यावेळी सांगितले. 
तसेच जिल्ह्यातील शेती, वीज, पाणीपुरवठा आणि शिक्षण विभागाचा देखील त्यांनी यावेळी आढावा घेतला. या विभागांमध्ये असलेल्या काही त्रुटींचा उल्लेख करत या त्रुटी सुधारण्याकडे देखील सर्व अधिकाऱ्यांनी जाती लक्ष घालावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
@@AUTHORINFO_V1@@