बोदवड तालुक्यातील प्रत्येक शेतात दोन वर्षात पाणी

    21-Mar-2018
Total Views | 20

आ.एकनाथराव खडसे यांची ग्वाही


 
बोदवड :
जिल्ह्यात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत १४ तालुके समाविष्ठ केलेले आहे. बोदवड तालुक्यात अवजार बँक उभारणार असून त्यामुळे मशागती व अन्य कामे कमी वेळात व खर्चात होतील. शेतकर्‍यांचा वेळ, पैसा वाचेल व कमी खर्चात जास्त पीक घेता येणार आहे. नवीन तंत्रज्ञान ही काळाची गरज असून ती गरज या कंपनीमार्फत पूर्ण होणार आहे. ही कंपनी १०० टक्के सौर उर्जेवर चालणारी आहे. यामुळे परिसरातील गरजूना रोजगार मिळेल, असा विश्‍वास भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला आहे.
 
 
येथील खप्तीसन इंजिनिअरिंग प्रा.लि.या कंपनीचे नुकतेच उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेती समृद्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल. बोदवड परिसर योजनेचे काम वेगाने सुरु असून दोन वर्षात पूर्ण होईल, अशी ग्वाही आ.खडसेंनी दिली. शेतकर्‍याला ५० ते १०० टक्के अनुदानावर गाई, बकर्‍या देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.खप्तीसन इंजिनिअरिंग कंपनीच्या माध्यमातून नवनवीन अवजार शेतकर्‍यासाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना यांचा लाभ होईल. उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतील पाण्याची आवश्यकता आहे. बोदवड परिसर जलसिंचन योजनेचे काम वेगाने सुरु आहे, अशी माहितीही आ. खडसे यांनी दिली.

शेतकरी बांधवांनो, जा आणि पहा... - आमदगावपासून दोन कि.मी. अंतरावर हे काम सुरु आहे. ते काम पाहण्यासाठी शेतकर्‍यांनी जावे, असे आवाहनही आ.खडसे यांनी केले. दोन वर्षात मुक्ताईनगर मतदार संघातील प्रत्येक शेतकरी समृद्ध झाला तरच विकास होईल, असेही आमदार खडसे म्हणाले.

 
 
 
कार्यक्रमाला रामदास शिवहरे, माजी आ.ज्ञानेश्‍वर पाटील (शहापूर,म.प्र.) अविनाश कनिकर, निलेश अग्रवाल, कृषी तंत्रज्ञान राहुरी विद्यापीठाचे प्राचार्य तुलसीदास बाराखोड आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी हरिओम जैस्वाल, सौ.संध्या जैस्वाल, अजय जैस्वाल, धनराज जैस्वाल, आनंद जैस्वाल, अलोक जैस्वाल, साक्षी जैस्वाल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन पुरुषोत्तम गड्डम यांनी केले.
 
अग्रलेख
जरुर वाचा
एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसमुळे प्रवाशांचे हाल ; ३००० नव्या बस खरेदीची प्रक्रिया सुरु; परिवहन मंत्र्यांची माहिती

राज्याच्या अनेक भागात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडाळाच्या बसेसच्या झालेल्या दूरवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. बसेस बाबत वारंवार नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून शासनाकडे निवेदन वा तक्रार करुनही नवीन बस खरेदी व बस स्थानकामध्ये सुधारणा करण्याबाबत कोणतीही प्रभावी उपाययोजना व त्याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही, असा सवाल राज्याच्या विविध भागातील आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसेसची कमतरता भरुन काढण्यासाठी रा.प. महामंड..

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121