मोदी ठरले जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते

    06-Dec-2018
Total Views | 16


 

नवी दिल्ली : भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखीन एक इतिहास रचला आहे. इंस्टाग्राम लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग सोशल नेटवर्किंग साईटवर मोदी हे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते ठरले आहेत. इंस्टाग्रामवर मोदींचे तब्बल १५.५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. टिप्लोमेसीने जाहीर केलेल्या ताज्या अहवालातून ही बातमी बाहेर आली. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तिसऱ्या नंबरवर राहिले असून इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो हे मोदीनंतर दुसऱ्या स्थानावर आहेत.

 

टिप्लोमेसीने आपल्या अहवालात म्हटले, जगभरात पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. मागील एकवर्षाचा अभ्यास केल्यास इंस्टाग्रामवरील त्यांचा ग्रोथ रेट ५० टक्क्यापेक्षा जास्त राहिला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १२ नोव्हेंबर २०१४ साली इंस्टाग्रामवर आले होते. मागील चार वर्षात त्यांनी आतापर्यंत २३७ पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान, टिप्लोमेसीच्या अहवालानुसार मोस्ट इंटरएक्टिव नेत्यांमध्ये मोदी चौथ्या तर ट्रम्प पहिल्या क्रमांकावर आहेत.

 

इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे नेते

 

1. नरेंद्र मोदी

2. जोको विडोडो

3. डोनाल्ड ट्रंप

4. पोप फ्रांसिस

5. क्वीन रनिया

6. रजब तैयब एर्दोआन

7. व्हाइट हाउस

8. रॉयल फैमिली

9. मोहम्मद बिन राशिद अल मकतूम

10. दिमित्री मेदवेदेव

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121