धक्कादायक; आश्रमातून ९ मुली गायब

    04-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : येथील 'संस्कार आश्रम फॉर गर्ल्स' (SAG) या सरकारी आश्रमशाळेतील ९ मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आश्रमाला तात्काळ भेट देऊन उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना याबाबतची माहिती दिली. यानंतर मनिष सिसोदिया यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १ डिसेंबरच्या रात्री दिलशाद गार्डन परिसरातील संस्कार आश्रमातून या ९ मुली बेपत्ता झाल्या. धक्कादायक म्हणजे या मुली बेपत्ता आहेत याची कोणालाही माहिती नव्हती. २ डिसेंबर रोजी मुली आश्रमात नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर जीटीबी एनक्लेव पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली. महिला आयोगाने सांगितल्यानुसार या मुलींची यापूर्वी विविध मानवी तस्करीमधून सुटका करण्यात आली होती.

 

महिला आयोगाच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असून महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना व आश्रमाच्या वार्डनला निलंबित केले आहे. तसेच पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरु केला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121