बोदवडला ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात विविध उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |


 
 
बोदवड :
 
येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले.
 
 
ग्राहक दिनाच्या कार्यक्रमानंतर कूटूंब अर्थसहाय्यचे 22 लाभार्थ्यांना आ.एकनाथराव खडसे यांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले.
 
 
तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी संदीप खाचणे यांचे वारस अलका खाचणे यांना एक लाखाचा धनादेश यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तालुक्यातील विधवा, परितक्त्या, अपंग, दुर्धर आजाराने त्रस्त 115 लाभार्थ्यांना शिधापत्रिका देण्यात आला. कार्यक्रमास ग्राहक मंचचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, शाळा, महाविद्यालय प्रतिनिधी विकास कोटेचा, गटविकास अधिकारी आर.ओ.वाघ उपस्थित होते.
 
 
अध्यक्षीय भाषणात आ. एकनाथराव खडसे यांनी ग्राहकाचे अधिकार व त्या अधिकाराचे फायदे याविषयी माहीती सागितली. ग्राहकाची फसवणूक झाल्यास त्यांना त्वरीत ग्राहकमंचाकडे न्याय मिळतो कोणत्याही प्रकारच्या वकिलाची गरज नसते.
 
 
तसेच ग्राहकाने जागरुक राहीले पाहीजे आपली फसवणूक झाल्याचे समजतात त्वरीत संबधीत विभागीकडे तक्रार करावी. बोदवड येथे तीन महिन्यात दिवाणी न्यायालय सुरु होणार असल्याचे त्यांनी सागीतले.
 
 
बोदवड तालुक्यात ऊज्वला गॅस योजनेअंतर्गत 3 हजार 500 गरजूंना गॅस सिलेडर देण्यात आल्याचे त्यांनी सागितले. यावेळी ग्राहक मंचचे अध्यक्ष अध्यक्ष गोपाल अग्रवाल, शेतकरी शेतमजूर संघटनेचे जिल्हाअध्यक्ष महेद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
 
 
यावेळी तहसिलदार रविद्र जोगी, नायब तहसिलदार वाडीलाल राठोड, पुरवठा अधिकारी संजय पाटील, माजी जि.प. सदस्य अनिल खंडेलवाल, बाजार समितीचे संचालक रामदास पाटील, तालुका अध्यक्ष भागवत टिकारे, पं.स.सदस्य किशोर गायकवाड, दिपक वाणी, निवृत्ती पाटील, विलास पाटील, अनिल वराडे, संजय पाटील, पी.पी.पाटील यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पी.एस.गड्डम यांनी केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@