पी.व्ही.सिंधूने घडवला इतिहास...

    16-Dec-2018
Total Views | 24


 


चीन : बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरची अंतिम फेरी जिंकत भारताच्या पी.व्ही.सिंधूने ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय होण्याचा मान प्राप्त केला आहे. तिने नोझुमी ओकुहारा हिला पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला. सिंधूचा हा कारकिर्दीतील ३०० वा विजय ठरला. सिंधूने वर्ल्ड टूर अंतिम स्पर्धेचे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी २००७मध्ये झालेल्या वर्ल्ड टूरच्या अंतिम सामन्यांमध्ये उपविजेते पदावरच समाधान मानावे लागले होते.

 

सिंधूने ओकुहारावर २१-१९,२१-१७ अशी मात करत या किताबावर स्वतःचे नाव कोरले. सलग सात वेळा पराभव स्वीकरल्यानंतर अखेर सिंधूने रविवारी विजेतेपद पटकावले. या वर्षात सिंधूने एकही विजेतेपद जिंकले नव्हते. त्यामुळे हे विजेतेपद पटकावून तिने हंगामाचा शेवट गोड केला.महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या रॅचनोक इन्टॅननवर २१-१६, २५-२३ अशी मात करत अंतिम फेरीत स्थान पटकावले. त्यानंतर तिची द्वितीय मानांकित ओकुहाराशी लढत झाली. यापूर्वी तब्बल १२ वेळा आमनेसामने आलेल्या या दोघींनी प्रत्येकी सहा वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे या दोघींच्या आजच्या लढतीकडे संपूर्ण बॅडमिंटन जगताचे लक्ष लागले होते. अखेर सिंधूने बाजी मारली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121