ही कामे आजच उरकून घ्या

    30-Nov-2018
Total Views | 47
 
 

मुंबई : १ डिसेंबरपासून बॅंकींग आणि पेन्शनच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल होत आहेत. त्यामुळे अजूनही ही कामे केली नसेल तर आजच उरकून घ्या. जाणून घेऊयात अन्य काही बदल...

 

पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र बंधनकारक

विशेषतः पेन्शन लाभार्थींसाठी हा महत्वाचा नियम आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही हे प्रमाणपत्र आजच जमा केले नाही तर तुमच्या खात्यात पेन्शन येणे बंद होईल.

 

 
 
 

केंद्रीय पेन्शनधारकांना कर्जासाठी प्रक्रिया शुल्क

तुमचे खाते जर बॅंक ऑफ इंडियामध्ये असेल आणि तुम्ही कर्ज घेण्यासाठी इच्छुक असाल तर उद्यापासून प्रोसेसिंग फी लागू होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बॅंकेने कर्ज देताना लागणारी प्रोसेसिंग फी माफ केली होती. मात्र, उद्यापासून ही सुविधा बंद करण्यात येईल.

 

 
 
 

एसबीआय बडी अॅप बंद

उद्यापासून एसबीआयचे बडी (SBI Buddy) वॉलेटही बंद केले जाणार आहे. तुमच्या बडी खात्यातील पैसे त्वरित काढून घ्या. २०१५मध्ये एसबीआयने बडी अॅप लॉन्च केले होते. परंतु, बॅंकेने नुकतेच योनो अॅप सेवेत आणले आहे.

 
 

 
 

ड्रोन उडवण्यासाठी नोंदणी शुल्क

१ डिसेंबरपासून परवाना काढून ड्रोन उडवू शकता. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने यासाठी एक धोरण जाहीर केले होते. त्यानुसार तुम्हाला नोंदणी करून युआयडी क्रमांक दिला जाईल. त्यासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येईल. मोठ्या ड्रोनसाठी वेगळा परवाना घ्यावा लागणार असून त्यासाठी पाच वर्षांचे शुल्क २५ हजार रुपये करण्यात येणार आहे.

 
 

 

 

पॅनकार्डवर वडिलांचे नाव पर्यायी

पूर्वी पॅनकार्डवर वडिलांचे नाव आवश्यक होते. मात्र, पॅनकार्डवर आता वडिलांचे नाव लावणे आवश्यक असणार नाही. कार्डावर तुम्ही आईचे नावही लाऊ शकता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

ऐतिहासिक वसई किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याबाबत शासनदरबारी मागणी : खानिवडे

११ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा हा मोठा गौरव आहे. मात्र याचबरोबर पोर्तुगीजांच्या जुलमी जोखडातून वसई प्रांताला मुक्त करणाऱ्या नरवीर  चिमणाजी अप्पा यांच्या साहसी शौर्याची परिसीमा असलेल्या मुंब‌ईपासून अगदी हाकेच्या अंतरावरील वसईच्या ऐतिहासिक किल्लाचा देखील जागतिक वारसा यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवप्रेमीनितीन म्हात्रे यांनी ..

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

भाजपा महिला विभागाचे महिला बचत गटांना मार्गदर्शन :खानिवडे

नायगांव पूर्व विभागातील जुचंद्र गावात (छत्रपती शिवाजी महाराज चौक) येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कार्यालयात जुचंद्र परिसरातील नव्याने तयार केलेल्या महिला बचत गटासाठी पहिल्यांदाच मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. वसई विधानसभा आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई पाटील यांच्या नेतृत्वात महिला मोर्चाच्याहर्षलाप्रविण गावडे यांनी आयोजन केले होते. ह्या महिला बचत गटाच्या मार्गदर्शन शिबिराला वसई पूर्व दक्षिण मंडळाचे अध्यक्ष उदय शेट्टी, अल्पसंख्यांक महिला मोर्चाच्..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121