हिटलिस्टवरील १२ दहशतवादी ठार !

    29-Nov-2018
Total Views | 9
 

नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमध्ये सुरू असलेले दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन यशस्वी होत आहे. स्थानिक दहशतवाद्यांची माहिती लष्कराला पुरवत असल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्यात लष्कराला यश असल्याची माहिती लष्कर प्रमुख बीपीन रावत यांनी दिली. बुधवारी लष्कराच्या कारवाईत लष्कर--तोयबाचा कमांटर नवीन जाट याचा खात्मा करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

बिपीन रावत म्हणाले, भारतीय लष्कराने एकूण १२ दहशतवाद्यांची यादी तयार केली होती. त्यातील सर्वांना कंठस्नान घालण्यात आम्हाला यश आले आहे. भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना ठार करायचे आहे.रायझिंग काश्मिर या वृत्तपत्राच्या संपादकांची हत्या करणाऱ्या कुख्यात दहशतवादी नवीन जाट याला ठार केल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

 

पाकव्याप्त काश्मिर संदर्भात बोलताना तिथल्या तरुणांना करण्यासाठी काही काम नसल्याने पाकिस्तानातील दहशतवादी त्यांना त्यांच्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पाकिस्तान धुर्तपणे पाकव्याप्त काश्मिर भागात वस्ती उभारत आहे. त्यामुळे काश्मिरींना ओळखणे कठीण होते. गिलगिट-बल्टिस्तान या भागातील लोक येथे येऊन राहत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121