मुंबई : मुंबईत आता घरखरेदी महागणार आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजुर करण्यात आले. त्यामुळे आता स्टॅम्प ड्युटी ६ टक्क्यांवरून ७ टक्के होणार आहे. मंगळवारी विरोधकांच्या गोंधळातच मुंबई महानगरपालिका अधिनियम सुधारणा विधेयक मंजुर करण्यात आले. हे विधेयक मंजुर झाल्यामुळे मुंबईतील घरखरेदी महागणार आहे. हे विधयक मंजुर झाल्यामुळे घरांच्या स्टॅप ड्युटीमध्ये १ टक्क्याची वाढ होणार असून ती ६ टक्क्यांवरून ७ टक्के इतकी होणार आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी म्हणजेच मेट्रो, मोनोरेल, जलद बस सेवा आदी सेवांच्या विकासासाठी यामध्ये एका टक्क्याची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घरांची विक्री, दान आणि गहाण ठेवण्यात येणा-या स्टॅम्प ड्युटीमध्ये यामुळे वाढ होणार आहे.
बांधकाम व्यवसायात मंदीनंतरही स्टॅम्प ड्युटीत वाढ
नोटबंदीनंतर बांधकाम व्यावसायात मंदी निर्माण झाली होती. अशा परिस्थितीतही स्टॅम्प ड्युटीमध्ये वाढ होणार असल्याने पुन्हा एकदा या व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली. घर खरेदी विक्री, भाडेतत्वावरील करार, बक्षीसपात्र करारनामा, गहाण ठेवण्यात आलेली कागदपत्रे आदी बाबींसाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.
दुस-यांदा बदल
मुंबई महानगरपालिका कायदा २०१८ मध्ये स्थावर मालमत्तेसंदर्भात स्टॅम्प ड्युटीचा दर ठरवण्यासाठी दुस-यांदा बदल करण्यात आला आहे. वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मोनो, मेट्रो यांसारखे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. वाढीव स्टॅम्प ड्युटीचा दर हा अशाच प्रकल्पांच्या विकासासाठी खर्च करण्यात येणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/