भुसावळात 8 डिसेंबरपासून बहिणाबाई महोत्सव

    18-Nov-2018
Total Views | 57
खा. रक्षाताई खडसे यांची पत्रपरिषदेत माहिती
 
भुसावळ-
खान्देशच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळावी, खान्देशच्या संस्कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा, बचत गटातील महिलांना आर्थिक विकासाबाबत मार्गदर्शन व्हावे या हेतूने बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन 8 ते 12 डिसेंबर यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान भुसावळ येथे करण्यात आले आहे, अशी माहिती खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली.
 
 
या महोत्सवात 300 महिला बचत गटांचे स्टॉल असतील. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, मुंबई आदी भागातील महिला बचत गट या महोत्सवात सहभागी होती. जळगाव येथील उमविला बहिणाबाई चौधरी यांचे नाव दिले गेले. या पार्श्वभूमीवर महोत्सवाचे खूप महत्त्व आहे.
 
 
यात पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ना. पंकजा मुंडे, ना. गुलाबराव पाटील, खा. ए. टी. नाना पाटील, महानंदाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, आ. हरिभाऊ जावळे, आ. चैनसुख संचेती, आ. स्मिताताई वाघ, आ. चंदू पटेल, आ. राजूमामा भोळे, आ. सतीश पाटील, आ. उन्मेश पाटील, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. शिरीष चौधरी, आ. किशोर पाटील, माजी आ. गुरुमुख जगवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन या महोत्सवात मिळणार आहे.
 
या महोत्सवात विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला मंडळे, सामाजिक संस्था सहभागी होती. विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या 10 महिलांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 
यात खान्देशसह राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या महिलांचा समावेश असेल. तसेच विविध सामाजिक संस्था महिला मंडळे, शैक्षणिक संस्था यांचा बहिणाबाई स्त्रीशक्ती सन्मान देऊन गौरव करण्यात येईल.
 
 
महोत्सवात प्रसिद्ध महिला उद्योजक जयंती कठाळे यांचे महिलांना मार्गदर्शन व त्यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. परिसरातील युवकांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदशन करण्यासाठी प्रा. यजुर्वेंद्र महाजन उपस्थित राहतील.
 
बचत गटांच्या स्टॉलच्या नोंदणीसाठी संपर्क
 
विनीता सुनील नेवे- ‘अटल’ शांतीनगर, भुसावळ, कल्पना रसवंती-शिवाजी कॉम्पलेक्स, जामनेर रोड, भुसावळ, साईजीवन सुपरशॉप- जामनेर रोड, भुसावळ, साईजीवन सुपरशॉप- यावल रोड, भुसावळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘कान्हदेशची लोकधारा’ महानाट्याचेही होणार आयोजन
 
महोत्सवात सांस्कृतिक कलानिकेतननिर्मित व मुकेश खपली दिग्दर्शित “कान्हदेशची लोकधारा” हे महानाट्य होईल. 75 स्थानिक कलाकारांचा यात समावेश असेल.
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावर आधारित खान्देशची लोकसंस्कृती दर्शविणारे तसेच सण, उत्सव व शेतीची कामे आणि ग्रामीण स्त्रीचे दर्शन घडविणारे हे महानाट्य असेल. लहान मुलांसाठी मॅजिक शो, कलावंतांना व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, समूह नृत्य, गीतगायन या स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.
 
पुणे येथील विलास नारायण करंदीकर यांनी तयार केलेल्या जुन्या पुरातन वस्तूंचे प्रदर्शन आठवणीतील आजीची भातुकली या महोत्सवात असेल.बहिणाबाईंच्या आयुष्यावर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन या महोतसवात केलेले आहे.
 
 
महोत्सवाचा समारोप 12 डिसेंबर रोजी होईल व विजेत्यांना पारितोषिक वितरित केले जाईल. बहिणाबाई महोत्सवाचे मुख्य आयोजक गुरुनाथ फाउंडेशनच्या अध्यक्षा खा. रक्षा खडसे असतील. महोत्सवाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे, सहप्रमुख प्रीती पाटील, कार्याध्यक्ष रमण भोळे तर स्वागताध्यक्ष आ. संजय सावकारे हे असतील.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121