अशोका बिल्डकॉनला दंडाची नोटीस

    14-Nov-2018
Total Views | 15

नुकसान भरपाईपोटी पाचोरा न.प.ची कारवाई

 
पाचोरा :
सध्या पाचोरा येथे नवीन हायवेच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनीसह उपवाहिन्या या हायवेलगत आहेत.
 
अशोका बिल्डकॉन व नगरपरिषददरम्यान झालेल्या चर्चेनुसार काम न करता अशोका बिल्डकॉनने काम सुरू करण्यासाठीची बाब लक्षात आणून न देता रस्त्याच्या कामास सुरुवात केली.
 
ज्यामुळे पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्यांची मोठ्या प्रमाणात तूटफूट होऊन पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जनतेचे पाणी न मिळाल्याने हाल झाले. नगरपरिषदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 
शहरात पाईपलाईनच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी पाचोरा नगरपरिषदेने अशोकला बिल्डकॉन कंपनीला पाच लाखांच्या दंडाची नोटीस बाजवण्यात आली आहे.
 
आधीच 20 ते 22 दिवसांपासून पाईपलाईन फुटल्याने शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. मागील आठ दिवसात झालेल्या हायवेचे काम त्यात गिरणाचे पाण्याचे आवर्तन आल्यानंतर पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली असता हायवेवर जागोजागी पाईपलाईन फुटल्याने जनतेचे खूप हाल झाले.
 
एवढ्या मोठया प्रमाणात पाचोरा नगरपरिषदेचे नुकसान झाल्यानंतरही अशोका बिल्डकॉन कंपनीच्या पदाधिकारी किंवा अधिकार्‍यांनी डोकावूनसुद्धा पाहिले नाही.
 
मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी दखल घेऊन पाणीपुरवठा विभागास आदेश दिले व तत्काळ काम करण्यास सांगितले. पाणीपुरवठा विभागाचे अमोल चौधरी, प्रकाश गोसावी यांनी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन तत्काळ दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली.
 
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या आदेशानुसार उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील यांनी नागरिकांचे झालेले हाल व नगरपरिषदेच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी अशोका बिल्डकॉन कंपनीस 5 लाखांच्या दंडाची रक्कम भरण्यासाठी नोटीस काढली आहे.
 
कंपनीने तत्काळ रक्कम भरावी व पाईपलाईनचे काम करावे. दंडाची रक्कम अथवा पाईपलाईनचे काम करावे, असे न केल्यास पाचोरा नगरपरिषदेतर्फे पुढील काम थांबविण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांनी दिला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121